Election Commission चा राहुल गांधींच्या मतचोरी आरोपांवर कडा प्रतिसाद
नवी दिल्ली: मतचोरीसंदर्भातील आरोपांवर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला होता. त्यांनी आरोप केला की, लोकसभा निवडणुकीच्या आधी अनेक मतदारांची नावे जाणीवपूर्वक हटवण्यात आली, विशेषत: आळंद (कर्नाटक) आणि राजुरी (महाराष्ट्र) मतदारसंघात. राहुल गांधींचा असा दावा होता की, अल्पसंख्य, दलित, मागासवर्गीय आणि काँग्रेस समर्थक मतदारांची नावे हटवली गेली असून मध्यवर्ती कॉल सेंटरचा वापर करून ही कारवाई केली गेली.या आरोपांना निवडणूक आयोगाने सोशल मीडियाच्या माध्यमातून कडा प्रतिसाद दिला आहे. आयोगाने स्पष्ट केले की, राहुल गांधींचे आरोप चुकीचे आणि निराधार आहेत. कोणतीही सामान्य व्यक्ती ऑनलाइन पद्धतीने मतदार नाव हटवू शकत नाही. तसेच, नाव वगळण्याआधी संबंधित मतदाराला आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात येते.निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, 2023 मध्ये आळंद मतदारसंघात नाव हटवण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला होता, त्यावेळी एफआयआरही दाखल करण्यात आली होती. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर राहुल गांधींचे आरोप अयोग्य आणि निराधार आहेत, असे आयोगाने म्हटले आहे.राहुल गांधी म्हणाले की, कर्नाटक सीआयडीने मतचोरीसंदर्भातील माहितीसाठी निवडणूक आयोगाला 18 पत्रे लिहिली होती, तरीही आयोगाने त्यांना एका शब्दानेही उत्तर दिले नाही. राहुल गांधींच्या मते, निवडणूक आयोगाने आठ दिवसांत ही माहिती दिली नसती, तर युवा जनतेला असा संदेश मिळेल की आयोग मतचोरांना आणि लोकशाहीच्या हत्येकरतांना पाठीशी घालत आहे.

राहुल गांधींचे मतचोरी आरोप निराधार, सत्य काय?”
read also : https://ajinkyabharat.com/bharatala-t20-middle-nawa-number-one-golandaz/