उत्तरकाशी | ८ मे २०२५ — उत्तराखंडमधील चारधाम यात्रेदरम्यान गुरुवारी सकाळी एक मोठा अपघात घडला.
यमुनोत्रीहून गंगोत्रीकडे जाणाऱ्या खासगी हेलिकॉप्टरला अपघात झाला,
ज्यामध्ये ६ जणांचा मृत्यू, तर एक प्रवासी अवघड वाचला.
Related News
रावळपिंडी स्टेडियमजवळ ड्रोन हल्ला
“वीज नाही” अशी तक्रार महागात;
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा डिजीटल स्ट्राइक!
वाडेगावात वादळी वाऱ्याचा कहर
संकटांशी झुंज देणाऱ्या उर्वशी संघवी यांचे प्रेरणादायी यश
ऑपरेशन सिंदूरचा परिणाम? देशभरात हवाई वाहतूक ठप्प
मुंबईकरांचा प्रवास महागला!
‘या खुदा, आज बचा लो’ – पाकिस्तानच्या संसदेत खासदाराचा भावनिक आवेग
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानची बिथरलेली कुरापत:
S-400 ‘सुदर्शन चक्र’ची किमया!
ऑपरेशन सिंदूरवर सीएम योगींची स्पष्ट भूमिका
ऑपरेशन सिंदूरवर संसदेतील सर्वदलीय बैठक सुरू
ही दुर्घटना सकाळी ८.४५ वाजता ऋषिकेश-गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर घडली.
अपघातग्रस्त हेलिकॉप्टर ‘एयरोट्रांस सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’ या खासगी कंपनीचं होतं.
यात्रेसाठी निघालेल्या या प्रवाशांमध्ये मुंबई, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश व गुजरातमधील नागरिकांचा समावेश होता.
मृतांमध्ये पायलट रॉबिन सिंह यांचाही समावेश आहे. केवळ मस्तू भास्कर (५१, मूळ – महाराष्ट्र)
हे एकमेव प्रवासी बचावले असून, त्यांनी सांगितलं की हा अपघात अचानक घडला आणि कोणालाही कल्पना नव्हती.
या अपघातानंतर विमान दुर्घटना अन्वेषण ब्यूरो (AAIB) ने तात्काळ तपास सुरू केला आहे.
मानवी चूक, यांत्रिक बिघाड, हवामान परिस्थिती किंवा इतर कारणं यांचा तपास केला जाईल.
यामध्ये हेलिकॉप्टरचा ब्लॅक बॉक्स, पायलटची संवाद रेकॉर्डिंग यांची सखोल पाहणी केली जाणार आहे.
चारधाम यात्रा सुरू होताच एवढा मोठा अपघात घडल्याने प्रशासनही हादरलं आहे.
हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांची यादी:
-
काला सोनी (६१), मुंबई
-
विजया रेड्डी (५७), मुंबई
-
रुचि अग्रवाल (५६), मुंबई
-
राधा अग्रवाल (७९), उत्तर प्रदेश
-
वेदवती कुमारी (४८), आंध्र प्रदेश
-
रॉबिन सिंह (६०), गुजरात – पायलट
Read Also : https://ajinkyabharat.com/pahalgam-hallyanantar-bharatacha-digital-estrak/