बदल करायचा असेल तर मनसेच्या हातात सत्ता द्या

मनसे

मनसे येत्या विधानसभेच्या निवडणुकीत २२५ जागा लढविणार!

महाराष्ट्रात बदल करायचा असेल तर मनसेच्या हातात सत्ता द्या.

यावेळी मनसे राज्यात २२५ जागावर लढणार आहे, असे विधान

Related News

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केले. ते शुक्रवारी, ता. २३ रोजी वणी

येथे कार्यकर्त्यांना संबोधित करीत होते. यावेळी त्यांनी वणी विधानसभेतून

मनसेचे विदर्भातील प्रमुख नेते राजू उंबरकर यांची उमेदवारी जाहीर केली.

पुढे बोलताना ते म्हणाले की राजाचे राजकीय वातावरणाचा गढूळ झाल आहे.

ज्यांना मतदारांनी मतदान केलं ते कोट्याच्या भावात विकले जात आहेत.

इकडून तिकडे, तिकडून इकडे जात आहे आणि सध्या कोण कुठल्या पक्षात

आहे समजत नाही. याचा जनतेला राग का येत नाही? आणि जनतेने त्यांचा राग

जे आहे विधानसभेच्या निवडणुकीत व्यक्त करायला हवा, असे आवाहनही

राज ठाकरे यांनी केले. बदलापूर येथील घटना ऑगस्ट दुर्दैवी आहे.

मनसे महिला पदाधिकाऱ्यांनी ते प्रकरण बाहेर काढलं आणि आता अत्याचार

करणाऱ्यांना महाराजांनी जसं त्याचे चौरंग केले होते तसे चौरंग करायची गरज आहे.

राज्यातील पोलीस यंत्रणा सक्षमपणे कार्य करीत आहे, मात्र राजकीय दबावपोटी

त्यांना काम करता येत नाही असेही राज ठाकरे यांनी म्हणाले. सोबतच यवतमाळ

जिल्ह्याच्या वणी विधानसभेसाठी त्यांनी राजू उंबरकर या यांच्या नावाची घोषणा केली आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/otherwise-i-will-launch-a-bigger-movement-than-bharat-bandh/

Related News