चंद्रपूर: बाबूपेठ उड्डाणपुलाला डॉ. बाबासाहेबांचे नाव !

बाबूपेठ उड्डाणपुलाची बाबूपेठवासीयांची मागील अनेक वर्षांची

मागणी अखेर पूर्णत्वास आली आहे. या उड्डाणपुलाचे लोकार्पण

करण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू आहे, तरी महापालिकेने

Related News

सर्वसाधारण सभेत घेतलेल्या ठरावानुसार या उड्डाणपुलाला डॉ.

बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देऊन लोकार्पण करण्यात यावे,

अशी मागणी माजी नगरसेवक स्नेहल देवआनंद रामटेके यांच्यासह

बाबूपेठवासीयांनी केली आहे. मागील अनेक वर्षांपासून येथील

नागरिक रेल्वेच्या उड्डाणपुलाअभावी मोठा त्रास सहन करीत होते.

रेल्वे फाटक बंद असल्याने प्रत्येक गंभीर रुग्णांना आपला जीव

गमवावा लागला होता. अखेर या पुलाला मंजुरी मिळाली रेल्वे

विभाग, महाराष्ट्र शासन आणि मनपा प्रशासन यांच्या माध्यमातून

या पुलाचे बांधकाम पूर्ण झाले. या पुलाचे बांधकाम सुरू

असतानाच चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत

तत्कालीन नगरसेवक स्नेहल रामटेके, अनिल रामटेके यांनी या

उड्डाणपुलाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी

केली होती. संपूर्ण सभागृहाने ही मागणी एकमताने मंजूर केली

होती. आता या पुलाचे काम पूर्णत्वास आले आहे. या पुलाचे

लोकार्पण करण्यासंदर्भात प्रशासनाकडून तयारी सुरू आहे.

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी लोकार्पण सोहळा

आयोजित केला जाईल, अशी नागरिकांत चर्चा आहे. मनपाने

सर्वसाधारण सभेत घेतलेल्या ठरावानुसार या उड्डाणपुलाला डॉ.

बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिल्यानंतर लोकार्पण सोहळा

घ्यावा, अशी मागणी स्नेहल रामटेके यांनी केली आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/demand-to-give-bharat-ratna-to-nitish-kumar/

Related News