तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख एन चंद्राबाबू नायडू आज चौथ्यांदा
आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
Related News
‘सगळं हवेतच उडवलं जाईल’; ट्रम्प यांची घोषणा –
नाशिकच्या जिंदाल कंपनीत सलग तिसऱ्या दिवशीही भीषण आग;
धक्कादायक! हडपसरमध्ये 22 वर्षीय विवाहितेचा हुंड्यासाठी छळ;
अकोल्याच्या पोलीस अधीक्षकपदावर बदल:
अकोल्यात मुसळधार पावसाचा कहर :
कालपासून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू :
अकोल्यात घिरट्या घालणाऱ्या विमानाचा उलगडा;
अकोल्यात प्री-मान्सून पावसाचा जोर;
अकोल्यात इंदिरा गांधींच्या पुतळ्याची विटंबना;
अकोला- जिल्ह्यात पावसाचा कहर, कांदा सह तीळ पिकांचे नुकसान
ज्योती मल्होत्रा ची खरी ओळख काय?
अकोल्यात विवाहसोहळ्यात ‘गौसेवे’चा अनोखा उपक्रम :
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि
केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि बंडी संजय कुमार यांच्यासह अनेक नेते
शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
अमित शाह आणि जेपी नड्डा या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी मंगळवारी संध्याकाळीच हैदराबादला पोहोचले आहेत.
मंगळवारी चंद्राबाबू नायडू यांनी विजयवाडा येथील
ए. कन्व्हेन्शन सेंटरमध्ये टीडीपीसह एनडीएच्या सर्व १६४ आमदारांसोबत बैठक घेतली.
या बैठकीत टीडीपी आणि एनडीएच्या आमदारांनी
चंद्राबाबू नायडू यांची नेता म्हणून निवड केली.
यानंतर एनडीए नेत्यांच्या विनंतीनंतर राज्यपाल एस अब्दुल नजीर यांनी मंगळवारी चंद्राबाबू नायडू
यांना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले.
त्यानंतर चंद्राबाबू नायडू यांनी राजभवनात राज्यपालांची यांची भेट घेतली आणि सरकार स्थापनेचा दावा केला.
चंद्राबाबू नायडू यांच्यासोबत इतर नेतेही शपथ घेण्याची शक्यता आहे.
ज्यामध्ये जनसेना प्रमुख पवन कल्याण आणि ज्येष्ठ नेते एन. मनोहर,
नायडू यांचे पुत्र नारा लोकेश
आणि टीडीपी आंध्र प्रदेशचे नेते अचेन नायडू यांचा समावेश आहे.
पवन कल्याण यांना उपमुख्यमंत्रीपद मिळणार असल्याचे म्हटले जात आहे.
चंद्राबाबू नायडूंच्या मंत्रिमंडळात एकूण २५ मंत्री असतील.
यामध्ये टीडीपीचे १९, जनसेनेचे ४ आणि भाजपचे २ मंत्री असणार आहेत.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीसोबत झालेल्या
आंध्र प्रदेश विधानसभेत टीडीपीसोबत असलेल्या एनडीएने एकतर्फी विजय मिळवला होता.
आंध्र प्रदेश विधानसभेत १७५ जागा आहेत.
या निवडणुकीत टीडीपीचे १३५ आमदार,
अभिनेते पवन कल्याण यांच्या जनसेनेचे २१ आमदार आणि भाजपचे ११ आमदार निवडून आले आहेत.
Read also : लडाखच्या अपक्ष खासदाराचा काँग्रेसला पाठिंबा (ajinkyabharat.com)