काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…

काही सेकंदांची चूक

उत्तराखंडातील ऋषिकेशमध्ये राफ्टिंगदरम्यान एक हृदयद्रावक घटना घडली असून,

एका युवकाचा गंगा नदीत बुडून मृत्यू झाला आहे.

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून,

Related News

तो पाहून कोणीही हादरून जाईल. ब्रह्मपुरी भागात ही दुर्घटना घडली असून,

मृत युवकाचे नाव सागर नेगी (राहणारे – देहरादून) असे आहे.

व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसते की ६ जणांचा एक गट गंगेच्या प्रवाहात राफ्टिंग करत होता.

यावेळी अचानक पाण्याचा जोर वाढला आणि त्या गटातील एक युवक राफ्टवरून खाली पडतो.

त्याला वाचवण्यासाठी इतर मित्र धडपड करत असले तरी त्याला बाहेर काढण्यात ते अपयशी ठरतात.

अवघ्या २० सेकंदांचा हा व्हिडीओ जीव आणि मृत्यूमधील संघर्षाचे दर्शन घडवतो.

या दुर्घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. काही नेटकऱ्यांनी राफ्टिंग संस्थांकडून वापरण्यात

येणाऱ्या उपकरणांच्या दर्जावर संशय व्यक्त केला आहे. तसंच, तांत्रिक ज्ञान आणि सुरक्षेची

योग्य पूर्वतयारी नसताना राफ्टिंगसारख्या साहसी खेळात उतरू नये, असा सल्ला देण्यात येत आहे.

सागर नेगी यांची राफ्ट ब्रह्मपुरी येथे उलटली आणि ते गंगेच्या प्रवाहात वाहून गेले.

याप्रकरणी अधिक तपास सुरू असून प्रशासनाकडून सुरक्षेच्या उपायांबाबत कठोर भूमिका घेण्याची मागणी होत आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/gausseva-work-by-jai-shri-ram-group/

Related News