चमचमता लाईट… आणि पुढच्याच क्षणी अंधत्व

अंधत्व

डोळ्यांना होऊ शकते गंभीर इजा; नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई

अकोला शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी शहरात विसर्जन मिरवणुका काढण्यात येत आहेत. मात्र, या मिरवणुकांमध्ये लेझर लाईटसारखी प्रकाशयंत्रणा वापरणे धोकादायक ठरू शकते, असा इशारा अकोला पोलिसांनी दिला आहे.अनेकदा मिरवणुकांमध्ये झगमगाट वाढवण्यासाठी लेझर लाईटचा वापर होताना दिसतो. या लाईटचा परिणाम थेट डोळ्यांवर होतो. मोठ्या प्रमाणात प्रकाश डोळ्यांवर पडल्यास कायमस्वरूपी इजा किंवा अंधत्व येण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, मिरवणुकांमध्ये लेझर लाईटचा वापर टाळावा. जे नियमभंग करतील, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

READ ALSO : https://ajinkyabharat.com/indian-embassy-public-pratikidhi-and-natekanchaya-prayanna-yash/