प्रसिद्ध कीर्तनकार आणि सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असणाऱ्या
चैतन्य वाडेकर यांना पिंपरी- चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे.
उपदेशाचे डोस पाजणारे रिल्स बनविणारे चैतन्य महाराज वाडेकर
Related News
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |
विवरा
देशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठी
अकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या अडगाव खुर्द गट ग्रामपंचायत मधील कातखेडा,
पिंपळखुटा गावामध्ये नागरिकांना मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने सर्व...
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-
बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र शेलुबाजार येथे संशयित क्षयरुग्नाचे तपासणी शिबिर
घेण्यात आले यामध्ये डिजिटल मशीनद्वारे संश...
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-
मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर्गत काही महिन्यांपूर्वीच पूर्ण झालेल्या रस्त्याची अवघ्या
सहा महिने ते एक...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोषण करत असलेले
शे दस्तगीर शे महेमुद देगाव येथील यानी लेखी तक्रारारी मधे काशीराम तुळशीराम गव्हाळे यांचे शेत
गट क्र २७...
Continue reading
सर्वश्रुत आहेत. मात्र सोशल मीडियावर संत बनू पाहणाऱ्या या चैतन्य
महाराजांचा एक प्रताप समोर आला आहे. या प्रतापापायी त्यांना
तुरुंगाची हवा सुद्धा खावी लागली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या
या कारवाईमुळं सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. चैतन्य
वाडेकरांनी तीन भाऊ आणि इतर साथीदारांच्या मदतीने खाजगी
रस्त्यासह कंपाऊंड उखडला आहे. चाकण एमआयडीसी हद्दीत
चैतन्य वाडेकर वास्तव्यास आहेत. तिथल्याचं एका बिल्डरसोबत वाडेकर
कुटुंबियांचे जमिनीवरून वाद सुरु आहेत. या बिल्डरने त्यांच्या घरा
लगतची जागा विकसित केली असून, तिथं कंपनी उभारण्यात आली आहे.
मात्र या बिल्डरने माझी जागा हडपली असून माझ्या जागेतून खाजगी
रस्ता केल्याचा आणि कंपाऊंड टाकल्याचा आरोप वाडेकर कुटुंबीयांनी
केला आहे. याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी सरकारी मोजणी करावी, अशी
मागणी वाडेकरांकडून नेहमी करण्यात येत होती. मात्र, ही मागणी
मान्यचं होत नव्हती. यावरून न्यायालयीन लढा सुरु असतानाच वाडेकरांच्या
बाजूने निकाल लागला आणि सरकारी मोजणीला मान्यता मिळाली.
मात्र, यातून ही जागा वाडेकरांच्या मालकीची आहे. हे सिद्ध होण्यासाठी
पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होणं, अपेक्षित होतं. न्यायालयाने मोजणीची
मागणी पूर्ण करताचं चैतन्य वाडेकर हरकून गेले. त्यांनी त्यांच्या तीन
भावांसह इतर साथीदारांना एकत्र केलं, जेसीबी ही मागवला आणि रात्रीतचं
कंपनीकडे जाणारा खाजगी रस्ता उखडून टाकला, कंपाऊंड ही तोडून टाकला.
मग प्रकरण महाळूंगे पोलीस स्टेशनमध्ये गेलं. आजवर समाजाला उपदेशाचे
सल्ले देणाऱ्या महाराजांचे रिल्स पाहिलेल्या पोलिसांना ही हा पराक्रम पाहून
धक्का बसला. आता चैतन्य महाराजांना महाराज म्हणावं तरी कसं? असा
प्रश्न पोलिसांना पडला आहे. त्यांनी आपली चूक मान्य न करता आपण किती
फेमस आहोत आणि किती शहाणे आहोत, याचे उपदेशाचे डोस द्यायला सुरुवात केली.
सुरुवातीला पोलिसांनी सबुरीने घेतलं, मात्र पोलिसांची सहनशीलता अखेर संपली.
मग स्वतःला महाराज समजणाऱ्या चैतन्य वाडेकरांना पोलिसांनी कायद्याचे डोस
पाजले. तेव्हा हवेत असणारे चैतन्य वाडेकर जमिनीवर आले. मग हळूहळू करत
आपल्या चुका मान्य करू लागले. सोशल मीडियावर हवा करणाऱ्या चैतन्य वाडेकरांना
अखेर तुरुंगाची हवा खावी लागली. पोलिसांनी त्यांच्यासह तीन भाऊ आणि इतर
दोन अशा सहा जणांना बेड्या ठोकल्या. जेसीबी ही जप्त केले आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/7-day-grand-marathi-dandiya-program-organized-by-bjp-in-mumbai/