चाहत्यांनी केला बचाव

हा तर सीता मातेचा अपमान…

मुंबई  –बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपटात अभिनेत्री साई पल्लवी सीतेची भूमिका साकारणार असून, या भूमिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. मात्र चित्रपट रिलीज होण्यास अद्याप बराच अवधी असतानाच साई पल्लवी ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

अलीकडेच साई पल्लवी आणि तिची बहीण पूजाने सुट्टीसाठी गेलेले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. समुद्रकिनाऱ्यावर स्विमसूटमध्ये दिसलेल्या दोन्ही बहिणींचे फोटो व्हायरल झाले. मात्र हे फोटो पाहून अनेकांनी टीका करत साई पल्लवीला “सीता मातेचा अपमान” अशा शब्दांत ट्रोल केले.

काहींनी “पडद्यावर पारंपरिक… खऱ्या आयुष्यात बिकिनी” असे खोचक कमेंट्स केले. तर काहींनी तिच्या ‘रामायण’ चित्रपटातील कास्टिंगवरच प्रश्न उपस्थित केले.

ट्रोलिंगला उत्तर देताना अनेक चाहते तिच्या बाजूने उभे राहिले.
 “समुद्रकिनाऱ्यावर स्विमसूटच घालतात, यात गैर काय?”
 “काय कपडे घालायचे, ही तिची वैयक्तिक निवड आहे.”
“साडी घालून समुद्रात पोहायचे का?”
अशा कमेंट्स करत चाहत्यांनी साई पल्लवीचा बचाव केला.

साई पल्लवी रणबीर कपूरसोबत ‘रामायण’ चित्रपटात झळकणार आहे. जुलै २०२५ मध्ये या चित्रपटाचा पहिला लूक – ‘रामायण: द इंट्रोडक्शन’ रिलीज करण्यात आला असून, राम-रावण महायुद्धाचा हा भव्य पट प्रेक्षकांसमोर येणार आहे.

read also:https://ajinkyabharat.com/300-rainy-tradition/