चऱ्होलीत जिम ट्रेनर तरुणी व मित्राकडून युवकाची हत्या; गुन्ह्याची पोलिसांत कबुली
पिंपरी-चिंचवड – शहरातील चऱ्होली परिसरात जिम ट्रेनर तरुणीने मित्राच्या मदतीने एका युवकाचा लोखंडी रॉडने मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली.
विशेष म्हणजे, गुन्हा केल्यानंतर दोघांनी स्वतःहून दिघी पोलीस ठाण्यात जाऊन खुनाची कबुली दिली.
मृत युवकाचे नाव लल्ला उर्फ गोपीनाथ वरपे असे आहे.
आरोपी प्रांजल तावरे आणि यश पाटोळे हे दोघेही जिम ट्रेनर असून, चऱ्होलीत प्रोटीन पावडरचे दुकान चालवतात. दुपारच्या सुमारास लल्ला दुकानात आला व प्रांजलशी अश्लील बोलू लागला.
यावरून वाद निर्माण झाला आणि लल्लाने शिवीगाळ केली. रागाच्या भरात प्रांजल व यश यांनी लोखंडी रॉड व पहाराने लल्लाला बेदम मारहाण केली.
गंभीर जखमी झालेल्या लल्लाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
त्यानंतर आरोपी दोघांनी थेट पोलिस ठाण्यात जाऊन संपूर्ण प्रकार सांगत गुन्ह्याची कबुली दिली. दिघी पोलिसांनी त्यांना अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.
READ ALSO :https://ajinkyabharat.com/saint-dnyaneshwar-maharaj-650th-jubilee-for-community-passay/