शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार!
गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशभरात कांदा दराने
मोठी उसळी घेतली आहे. सध्याच्या घडीला राज्यातील बाजार
Related News
“राज्यातील सरकार ही लुटारू रचना” – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
भारतमाला एक्सप्रेस हायवेवर ज्वलनशील केमिकलने भरलेला टँकर उलटला;
सीकर कृषी मंडीत भीषण आग;
हनुमान जयंतीनिमित्त भव्य धार्मिक आयोजन – भक्तांनी घेतला आनंद
पातूर येथे उत्साहात गुरु-शिष्य जयंती साजरी
दिल्ली विमानतळावर तात्पुरता बदल: T2 टर्मिनल बंद,
श्रीनगर – अमरनाथ यात्रा 2025 साठी नोंदणी प्रक्रियेची सुरुवात झाली आहे…
अंबेडकर जयंती शोभायात्रा दरम्यान युवतीसोबत छेडछाड;
आर्थिक सुबत्ता असेल तरच इतरांशी स्पर्धा करू शकतो : डॉ सुगत वाघमारे
“ब्लू ओरिजिन”ने रचला इतिहास; केटी पेरीसह ६ महिलांचा यशस्वी अंतराळ प्रवास
वाराणसी सामूहिक बलात्कार प्रकरण : डीसीपी चंद्रकांत मीणा हटवले; पंतप्रधान मोदी नाराज
खामगाव-नांदुरा रोडवर भीषण अपघात: बस आणि ट्रकची समोरासमोर धडक; ३ ठार, २० जण गंभीर जखमी
समित्यांमध्ये कांद्याला ४००० ते ५५०० रुपये प्रति किंटल दर मिळत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अकलूज बाजार समितीत आज काद्यांला उच्चांकी
५५०० रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना
चांगला आर्थिक फायदा होत आहे. मात्र, अशातच आता केंद्र सरकार कांदा
दर पाडण्याच्या तयारीत असल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्र सरकार
कांदा दर पाडण्यासाठी राखीव साठ्यातील कांदा बाहेर काढण्याची तयारी
करत आहे. याच मुद्द्यांवरून आता स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
झाल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्र सरकार निवडणुका पाहून कांदा उत्पादक
शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचे धोरण राबवत आहे. अशी टीका
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी केली आहे.
कांदा दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकार राखीव साठ्यातील कांदा
बाजारात उतरवणार आहे. त्यामुळे राज्यातील कांदा दर कोसळण्याची शक्यता आहे.
सध्या शेतकऱ्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळत आहे. अर्थात शेतकऱ्यांना दोन पैसे
मिळत असताना, सरकारने राखीव साठ्यातील कांदा बाजारात उतरवल्यास,
शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. हीच बाब लक्षात घेऊन केंद्र
सरकार शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने
म्हटले आहे. दरम्यान, आज सोलापूर जिल्हयातील अकलूज बाजार समितीत
कांद्याला कमाल ५५०० रुपये, किमान १५०० रुपये ते ३५०० रुपये प्रति क्विंटल
इतका उच्चांकी दर मिळाला आहे.