सेलिब्रिटींच्या वाढत्या मागण्या

आलिया भट्टची मुलगी राहासाठी खास व्हॅनिटी व्हॅन!

महेश भट्ट म्हणाले – “हे मंदिरासारखं पवित्र स्थान” बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटींच्या वाढत्या मागण्या हे नेहमीच चर्चेचं केंद्र असतं. काही दिवसांपूर्वीच एका दिग्दर्शकाने सांगितलं होतं की अनेक कलाकार सेटवर अतिशय खर्चिक मागण्या करतात. काहींच्या तर प्रत्येकी 10-11 व्हॅनिटी व्हॅन असतात, ज्याचा खर्च निर्मात्यांवर येतो. या वादंगाच्या पार्श्वभूमीवर, आता आलिया भट्टची मुलगी राहासाठी वेगळी व्हॅनिटी व्हॅन असल्याची चर्चा रंगली आहे. आलियाचे वडील महेश भट्ट यांनी स्वतः या गोष्टीचा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितलं की आलियाच्या एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान राहाची वेगळी व्हॅनिटी व्हॅन पाहायला मिळाली. “राहाची व्हॅनिटी व्हॅन एखाद्या नर्सरी स्कूलसारखी दिसत होती. मला तिथे गेल्यावर मंदिरात असल्यासारखं वाटलं,” असं महेश भट्ट म्हणाले. आलियाने त्यांना आत बसायला सांगितलं, पण त्यांनी हसत नकार दिला – “नको, या म्हाताऱ्यासाठी तिथे जागा नाही.” महेश भट्ट यांच्या मते, आजच्या अभिनेत्री लग्नानंतर आणि आई झाल्यानंतरही करिअरमध्ये उत्तम संतुलन साधत आहेत. आलिया भट्ट याचं उत्तम उदाहरण आहे. ती राहाला आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांनाही घेऊन जाते आणि शूटिंग शेड्यूल राहाच्या सोयीप्रमाणे ठरवते. चित्रपटसृष्टीत लक्झरी व्हॅनिटी व्हॅन आणि मोठा स्टार स्टाफ हा नवा ट्रेंड बनला आहे. काही मोठे स्टार्स सहा व्हॅनिटी व्हॅन आणि 30 लोकांचा स्टाफ मागतात. आता या लक्झरी सुविधांचा विस्तार स्टार किड्सपर्यंत झालेला दिसतो. राहासाठी वेगळी व्हॅनिटी व्हॅन ही त्याचं ताजं उदाहरण मानलं जातं.

read also:https://ajinkyabharat.com/health-and-yoga-shibirache-organizing/