अवैधरित्या कत्तलीसाठी नेन्यात येत असलेला गोवंश आरोपीसह पोलिसाचा जाळ्यात

अवैधरित्या कत्तलीसाठी नेन्यात येत असलेला गोवंश आरोपीसह पोलिसाचा जाळ्यात

१लाख ७२ हजाराचे गोवंश जप्त
—————————————
ग्रामीण व शहर पोलिसांची वेगवेगळ्या कारवाई
—————————————-
एक आरोपी अटक तर एक फरार
—————————————-
जप्त गोवंश पुंडलीक बाबा गोरक्षण संस्थेच्या स्वाधीन
————————————–

मूर्तिजापूर : शहर व ग्रामीण पोलीसांनी केलेल्या वेगवेगळ्या दोन कारवाईत सहा गोवंश कत्तलिसाठी

नेत असल्याचा मिळालेला गुप्त माहितीवरुन सिरसो शेत शिवार व ५२ गेट जवळ केलेल्या धडक कारवाईत ६ गोवंश

Related News

अवैधरीत्या कट्टलीसाठी नेत असताना धाड टाकून एका आरोपीस मुद्देमालासह अटक करण्यात आली तर एक आरोपी फरार झाल्याची

घटना गुरुवारी दुपारच्या दरम्यान घडली आहें .

तालुक्यातील ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीधर गुट्टे यांना विश्वसनिय सूत्रानुसार मिळालेला गुप्त माहितीवरुन

सिरसो शेत शिवारात चार गोवंश ज्यांची किंमत ८२ हजार अवैधरीत्या कत्तलीसाठी नेत असल्याच्या माहिती वरून सहायक पोलीस

उपनिरीक्षक संजय खंडारे व पो. कॉ. गणेश ठाकरे आपल्या सहकाऱ्यांसह गेले असता ४ गोवंश निर्दयीपणे बांधलेले दिसताच पोलिसांना

पाहून आरोपी पसार झाला तर दुसरी कारवाई शहर पोलिसांना मिळालेला गुप्त माहितीवरुन ठाणेदार अजित जाधव यांनी

उपनिरीक्षक आशीष शिंदे, अमंलदार सुरेश पांडे, नंदकिशोर टिकार, महीला पोलिस आलिषा कांबळे, पो. कॉ. ज्ञानेश्वर राणे,

नामदेव आडे, सचिन दुबे, यांनी मिळालेला माहिती वरुन ५२ गेट जवळ धाड टाकली असता निर्दयीपणे कत्तलीसाठी बांधण्यात आलेले

दोन गोवांश अंदाजे किमत ९० हजारचे आरोपी शेख यासीन शेख हूनुर कुरेशी वय ५२ रा. रोशननगर मुर्तिजापूर यास अटक करुन

सदर प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आशीष शिंदे व ग्रामीण पोलीस ठाण्याचे पो का गणेश ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी विरूध्द

दोन्हीं पोलिस ठाण्यात कलम ५,५(अ),५(ब),महा९,९(अ) महा (अ) महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम नुसार गुन्हा

दाखल करून अधिकचा तपास सुरू असून ताब्यात घेण्यात आलेले सहा गोवंश पुंडलीक बाबा गोरक्षण संस्थेच्या स्वाधीन करण्यात आले .

इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/baba-reading-hall-at-vazhegaon-vachan-sankalp-maharashtra-initiative-completed/

 

Related News