[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
  • No categories
  • No categories
Summer Health Tips: उन्हाळ्यात चुकीच्या पद्धतीने काकडी चे सेवन केल्यास शरीरावर होतील 'हे' दुष्परिणाम

Summer Health Tips: उन्हाळ्यात चुकीच्या पद्धतीने काकडी चे सेवन केल्यास शरीरावर होतील ‘हे’ दुष्परिणाम

काकडी ही अशीच शरीरात थंडावा निर्माण करणारी असल्यामुळे उन्हाळ्यास अनेकांना गारेगार काकडी खाण्यास फार आवडते. काकडीत पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे ती शरीरास पोषक देखील असते. ...

Continue reading

सतत जांभई येत असल्यास लगेच डॉक्टरांना भेटा; तुम्हाला असू शकतात 'या' आरोग्यविषयक गंभीर समस्या

सतत जांभई येत असल्यास लगेच डॉक्टरांना भेटा; तुम्हाला असू शकतात ‘या’ आरोग्यविषयक गंभीर समस्या

Excessive Yawning Disease Symotoms: आपल्याकडे सामान्यपणे जांभईला झोप किंवा कंटाळ्याशी जोडलं जातं. मात्र वारंवार जांभई येत असेल तर वेळीच सावध होणं गरजेचं आहे. सतत जांभई येण्याचा न...

Continue reading

उन्हाने जीवाची होतीया काहीली, पण या 5 लोकांनी ऊसाचा रस अजिबात पिऊ नये..का ते वाचा

उन्हाने जीवाची होतीया काहीली, पण या 5 लोकांनी ऊसाचा रस अजिबात पिऊ नये..का ते वाचा

Sugarcane Juice : उन्हाळा सुरु झाल्याने ऊन मी म्हणत आहे. अनेकजण उन्हाळ्यात थंडावा मिळण्यासाठी ऊसाच्या रसाची दुकाने शोधत असतात. परंत ऊसाचा रस जर शरीराला चांगला असला तरी काही लोकां...

Continue reading

महाकालेश्वरच्या मंदिरात पोहोचण्याआधीच काळाचा घाला, भीषण अपघातात भिवंडीतील दोन्ही डॉक्टर बहिणींचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

महाकालेश्वरच्या मंदिरात पोहोचण्याआधीच काळाचा घाला, भीषण अपघातात भिवंडीतील दोन्ही डॉक्टर बहिणींचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

डॉक्टरांचं कुटुंब हे सर्व मिळून देवदर्शनासाठी जात होते. मात्र मंदिरात पोहोचण्याआधीच त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला, त्यामध्ये दोन बहिणींचा मृत्यू झाला. कारचा अक्षरश: चक्काचूर झा...

Continue reading

झोपण्यापूर्वी मखाना दूध प्यायल्यास काय होते? जाणून घ्या फायदे आणि नुकसान

झोपण्यापूर्वी मखाना दूध प्यायल्यास काय होते? जाणून घ्या फायदे आणि नुकसान

मखाना हा एक सुपरफूड मानला जातो. हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. लोकं अनेक प्रकारे मखान्याचे सेवन करत असतात. पण जर तुम्ही रात्री दुधासोबत मखाना घेतला तर तुम्हाला त्याचे अन...

Continue reading

चालणं हा व्यायाम नाही! न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने थेट सांगून सांगितले व्यायामाचे सर्वोत्तम प्रकार

चालणं हा व्यायाम नाही! न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने थेट सांगून सांगितले व्यायामाचे सर्वोत्तम प्रकार

आपल्यापैकी अनेकजण दररोज न चुकता 40 ते 45 किमी चालतात. पण न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने थेट सांगितलं की, चालणं हा व्यायाम नाहीत. त्यामुळे व्यायामासाठी नेमकं काय करावं? बैठी जीवनशै...

Continue reading

पुणे: पुणे शहरातील चंदननगर परिसरामध्ये पत्नीवरील चारित्र्याच्या संशयातून आयटी अभियंत्याने आपल्या साडेतीन वर्षाच्या मुलाचा जीव घेतल्याची माहिती समोर आली आहे. पत्नीशी भांडण आणि तिच्यावर असलेल्या संशयातून पतीने चाकूने गळा चिरून मुलाचा निर्घृणपणे खून केल्याची घटना समोर आली आहे. हिम्मत माधव टिकेटी असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. काल (शुक्रवारी दि. 21) दुपारी नगररोड दर्गाच्या बाजूला पराशर सोसायटी विमानतळ परिसरातील निर्जनस्थळी मुलाचा मृतदेह आढळून आला होता, ही धक्कादायक घटना पुण्यातील चंदननगर परिसरात घडली असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आयटी अभियंता असलेला माधव साधुराव टिकेटी (38, रा. रतन प्रेस्टीज बिल्डिंग, तुकारामनगर, चंदननगर) असे खून करणाऱ्या नराधम बापाचं नाव असून, त्याला चंदनगर पोलिसांनी अटक केली आहे. तो मूळचा विशाखापट्टनम येथील राहणारा असून, 2016 पासून तो पुण्यात वास्तव्यास आहे. याबाबत स्वरूपा माधव टिकेटी (वय ३०) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्वरूपा ह्या चंदननगर येथे त्याचे पती माधव, आठ वर्षाची मुलगी व तीन वर्षाच्या मुलासोबत राहण्यास आहेत. त्या गृहिणी असून, पती माधव हा आयटी कंपनीत अभियंता आहे. माधव पत्नीवर नेहमी चारित्र्याचा संशय घ्यायचा अन्... चंदननगर परिसरातमध्ये हे कुटुंब वास्तव्यास आहे. आरोपी माधव आणि त्याची पत्नी स्वरूपा हे उच्चशिक्षित आहेत. त्यांना आठ वर्षांची मुलगी आहे आणि साडेतीन वर्षाचा मुलगा होता. माधव हा आयटी कंपनीत कामाला आहे. पण काही महिन्यांपूर्वी त्याला कामावरून काढून टाकले होतं. तसेच तो सतत दारूच्या नशेत असतो. माधव पत्नीवर नेहमी चारित्र्याचा संशय घेत होता. गुरुवारी सकाळी त्याचे पत्नीशी भांडण झाले. भांडणाच्या आवाजामुळे हिंमत झोपेतून उठला. दुपारी साडेबारा वाजता माधव घरातून बाहेर पडत असताना त्याने मुलीला घेऊन येतो म्हणून घरातून निघाला सोबत मुलाला घेऊन निघाला. त्यामुळे आरोपीने मुलाला दुचाकीवर बसवून सोबत नेले. खराडी परिसरात फिरल्यावर त्याने दारू प्यायली आणि एका दुकानातुन धारदार चाकू खरेदी केला. त्यानंतर खराडी दर्ग्यासमोरील फॉरेस्ट पार्क परिसरात निर्जनस्थळी जाऊन चाकूने मुलाचा गळा चिरून खून केला. त्याने मुलाला तिथेच टाकलं आणि तो सायंकाळी वडगाव शेरीतील एका लॉजमध्ये जाऊन झोपला. रात्रीचे नऊ वाजले त्यानंतर पती आणि मुलगा घरी न आल्याने आईने चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी परिसरातील ‘सीसीटीव्ही’ आणि तांत्रिक विश्लेषणावरून आरोपीचा शोध घेतला. त्याने भरपूर दारू प्यायली होती. मुलाचा ठावठिकाणा सांगता येत नव्हता. शुक्रवारी पुन्हा आरोपीकडे कसून तपास केल्यावर मुलाचा खून केल्याची कबुली दिल्याची माहिती दिली . असा झाला खुनाचा उलगडा माधवसोबत मुलगा हिम्मत पोलिसांना सापडला नाही. त्यांनी त्याच्याकडे चौकशी केली. मात्र, त्याने आपण दारू पिल्यानंतर सिगारेट ओढत असताना हडपसर येथील बस स्टँडवर तो हरवला असं सांगितलं. पोलिसांना माधवच्या बोलण्यावर संशय होता. दरम्यान, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सीमा ढाकणे, स्वाती खेडकर, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत माने, उपनिरीक्षक अजय असवले, राहुल कोळपे, पोलिस हवालदार विश्वनाथ गोणे यांच्या पथकाने माधवला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवला आणि चौकशी केली, त्यानंतर त्याच्याकडून या धक्कादायक प्रकाराची माहिती मिळाली. मुलाचा खून करून त्याचा मृतदेह फेकून दिल्याचे सांगितले. दुकानातून चाकू, ब्लेड विकत घेतलं तपासादरम्यान पोलिसांना नराधम माधवचं सीसीटीव्ही फुटेज हाती लागलं. त्यामध्ये माधव मुलगा हिम्मत याला घेऊन जाताना दिसत आहे. तसेच, एका दुकानातून त्याने ब्लेड आणि चाकू खरेदी केला. त्यानंतर त्याने गुरुवारी दुपारी अडीच ते पावने तीनच्या सुमारास मुलगा हिम्मतचा चाकूने गळा कापून खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह तिथेच फेकून दिल्यानंतर लॉजवर येऊन झोपला होता.

‘हा मुलगा माझा नाही’, पतीच्या डोक्यावर संशयाचं भूत, तीन वर्षांच्या मुलाला घेऊन गेला त्याला संपवलं अन्…दारू पिऊन लॉजवर गेला

Father kills son: फिर्यादी स्वरूपा ह्या चंदननगर येथे त्याचे पती माधव, आठ वर्षाची मुलगी व तीन वर्षाच्या मुलासोबत राहण्यास आहेत. त्या गृहिणी असून, पती माधव हा आयटी कंपनीत अभियंता आह...

Continue reading

Nanded Crime : आम्ही देशमुख, तुम्ही पाटील, तुमची औकात नाही...; नांदेडमध्ये प्रेमप्रकरणातून तरुणाला मारहाण, उचललं टोकाचं पाऊल

Nanded Crime : आम्ही देशमुख, तुम्ही पाटील, तुमची औकात नाही…; नांदेडमध्ये प्रेमप्रकरणातून तरुणाला मारहाण, उचललं टोकाचं पाऊल

Nanded Crime : आमच्या मुलीशी का बोलतोस, असे म्हणत नातेवाईकांनी तरुणाला बेदम मारहाण केली होती. यानंतर तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याने नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे. Nanded Crime : आमच्...

Continue reading

दररोज केळी खाल्ल्यास शरीरावर होणारे फायदे

दररोज केळी खाल्ल्यास शरीरावर होणारे फायदे

केळं हे वर्षभर उपलब्ध असलेलं आणि सहज परवडणारं फळ आहे. बहुतांश घरांमध्ये केळी आढळतात, आणि काही लोक तर रोजच त्याचं सेवन करतात. पण दररोज केळी खाल्ल्याने शरीरावर कोणते परिणाम होतात? ...

Continue reading

पुण्यातील हिंजवडीत काल (बुधवारी, ता 20) सकाळी एका टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बसला भीषण आग लागून कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बसच्या चालकानेच सहकारी कामगारांच्या त्रासाला कंटाळून आग लावल्याचं संतापजनक कारण समोर आलं आहे. चौकशीदरम्यान महत्त्वाची माहिती समोर आल्यानंतर आता हिंजवडी जळीत हत्याकांड प्रकरणाचा मुख्य सूत्रधार म्हणून पोलिसांनी बस चालक जनार्दन हंबर्डीकर याच्याविरुद्ध कट रचून खून केल्याचे गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, या प्रकरणात आरोपी जनार्दन याला नाहक गोवलं जात असल्याचा आरोप, त्याच्या पत्नी आणि भावाने केला आहे. वाचलेल्यांपैकी काही जणांना खरचटले देखील नाही... आरोपी जनार्दन हंबर्डीकर हे पूर्णतः शुद्धीत नसताना पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवलाच कसा असा सवाल उपस्थित करत ज्या बसला आग लागली, त्यामध्ये आरोपी जनार्दनचे सख्खे भावजी देखील होते, त्यामुळे ते आग कशी लावतील शिवाय घटनेत वाचलेल्यांपैकी काही जणांना खरचटले देखील नाही, त्यामुळे पेटत्या बसमधून ते सुखरूप बाहेर कसे पडले? आणि पोलिसांच्या म्हणण्यानुसार जनार्दन यांनी बसला आग लावण्यासाठी केमिकल आणतांना त्यांना कंपनीतील कुणीच का रोखले नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित करत, जनार्दन हंबर्डीकरच्या कुटुंबियांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. माझा भाऊ निर्दोष असताना देखील त्याला या प्रकरणात गोवलं जात आहे. जर त्याने ते केमिकल कंपनीतून घेतल्याचा दावा केला जातो. पण, ज्या कंपनीतून एक छोटा कागद घेऊन जाऊ शकत नाही त्या कंपनीतून त्याने हे केमिकल कसं नेलं. ते कॅन नेत असताना त्याला का अडवलं गेलं नाही. हा माझा अक्षेप आहे. सकाळीपासून तो स्टेबल नसताना पोलिसांनी त्याची दोन ते अडीच तास काय माहिती घेतली. त्याची स्थिती ठिक नसताना पोलिस त्याच्याकडून अडीच ते तीन तास स्टेटमेंट घेतात. त्या गाडीमध्ये एक महिला आणि बाकी सर्व पुरूष होते. जर त्याने गाडी लॉक केली तर त्यामध्ये तीन लोक असे आहेत की त्यांना खरचटल देखील नाही. जर त्याने दरवाजा लॉक केला असताना तर मग हे लोक कसे बाहेर आले, असा सवाल चालक जनार्दन हंबर्डीकरचा भाऊ यांनी म्हटलं आहे. त्या बसमध्ये माझे भाऊजी गाडी लॉक होती तर इतर वाचलेले सहा ते सात जण बाहेर कसे आले मग? दरवाजा उघडा नव्हता तर बाकी कसे बाहेर आले असते. एखादा दुसरा खिडकी तोडून बाहेर आले असते. पण सगळेच खिडकी तोडून बाहेर आले नसते, त्या बसमध्ये माझे भाऊजी विश्वास खानविलकर देखील होते. ते सर्वजण बाहेर पडल्यानंतर ते सर्वात शेवटी बाहेर पडले होते. दरवाडा उघडा होता त्यामुळे ते बाहेर पडले. असा कोणता भाऊ असेल जो आपल्या बहिणीचं कुंकू पुसायला तयार असेल. माझा भाऊ निर्दोष आहे. आम्हाला न्याय मिळावा, असं विजय हंबर्डीकर चालक जनार्दन हंबर्डीकरच्या भावाने म्हटलं आहे. पत्नी काय म्हणाली? जी कारणे सांगितली जात आहेत. बोनस मिळाला नाही इतर काही गोष्टी त्यापैकी काहीच माझ्या नवऱ्याने मला सांगितलेलं नाही. मला दिवाळीला त्यांनी पैसे दिले होते. मला दिवाळीला त्यांनी पैसे दिले होते. जर त्यांना पैसे मिळाले नसते तर त्यांनी मला पैसे दिले नसते. ते कामाला जातात तसे मी त्यांना सकाळी सहा वाजेपर्यंत डब्बा बनवून देत होते. ते शुगर पेशंट होते. ते 2006 पासून तिथे होते. जर त्या कंपनीतील लोकांना ते केमिकल घेऊन जाताना दिसले तर त्यांनी त्याबद्दल विचारायला हवं होतं. त्यांना या प्रकरणात गोवलं जात आहे. नक्की काय खरं आहे खोटं आहे याचा तपास झाला पाहिजे माझ्या नवऱ्याला न्याय मिळाला पाहिजे असंही चालकाची पत्नी नेहा हंबर्डीकरने मागणी केली आहे.

माझ्या नवऱ्याला विनाकारण गोवलं जातंय, जळालेल्या बसमध्ये चालकाचे सख्खे भावोजी; हंबर्डीकरांच्या पत्नीचा दावा, नेमकं काय सांगितलं?

Pune Hinjwadi Bus Fire: आरोपी जनार्दन हंबर्डीकर पूर्णतः शुद्धीत नसताना पोलिसांनी त्याचा जबाब नोंदविलाच कसा असा सवाल उपस्थित करत त्याच्या पत्नी अन् भावाने त्याला या प्रकरणात गोवलं ...

Continue reading