संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल

विधान

विधानसभा निवडणुकीआधी शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार

संजय राऊत यांच्या अडचणी वाढल्या आहेत. संजय राऊत यांच्या

विरोधात मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

Related News

खोटी अफवा पसरवल्याबद्दल संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा

दाखल झालाय. मध्य प्रदेशातील लाडकी बहिण योजना बंद पडल्याचा

दावा राऊतांनी केला होता. त्यानंतर भोपाळमध्ये भाजप महिला

मोर्चाने पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर आता संजय राऊत

विरोधात गुन्हा झाला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत

यांच्याविरोधात मध्य प्रदेशातील भोपाळ शहरात गुन्हा दाखल

करण्यात आला आहे. संजय राऊत यांनी ‘लाडकी बहिण’ योजने

वरून सरकारवर टीका केली. मध्यप्रदेशमध्ये ही योजना बंद

पडल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. त्यानंतर राऊतांच्या

या विधानावर आक्षेप घेण्यात आला. भाजप महिला मोर्चाने याबाबत

तक्रार केली. भोपाळमधील भाजप महिला मोर्चाच्या नेत्या सुभाषा

चौहान यांनी संजय राऊतांच्या विधानावर आक्षेप घेतला. सुभाषा चौहान

यांच्या तक्रारीनंतर संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला

आहे. संजय राऊत यांनी समाजात खोटी माहिती पसरवली. जनतेची

दिशाभूल केली आहे. त्यामुळे जनतेमध्ये गैरसमज निर्माण होण्याची

शक्यता आहे, असं सुभाषा चौहान यांनी दाखल केलेल्या तक्रारीत

म्हणण्यात आलं आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/senior-industrialist-ratan-tata-passes-away/

Related News