अहिल्यानगर – ओबीसी आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलक लक्ष्मण हाके यांच्यावर शनिवारी (ता. २७) अहिल्यानगरजवळील पाथर्डी तालुक्यातील आरनगाव बाह्यवळण रस्त्यावर अज्ञात तरुणांनी अचानक हल्ला केला. हल्ल्यात हाके यांचे वाहन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, गाडीच्या काचाही फोड करण्यात आल्या आहेत. सुदैवाने, हाके यांना शारीरिक इजा झाली नाही.लक्ष्मण हाके यांनी सांगितले की, हल्ला करणाऱ्यांमध्ये दळवी नावाचा व्यक्ती आणि त्याचे सहकारी होते, ज्यांचे फोटो आता शरदचंद्र पवार आणि निलेश लंके यांच्यासोबतही समोर आले आहेत. हाके यांनी या सर्वांचा आरोप करत सांगितले, “या लोकांनी माझ्यावर जाणीवपूर्वक हल्ला केला आहे. माझी या लोकांशी वैयक्तिक दुश्मनी नाही, पण पवार कुटुंबाने असे गुंड पोसलेले आहेत. आजपर्यंत माझ्यावर ८ ते ९ हल्ले झाले आहेत, पण कारवाई होत नसल्यामुळे मला संरक्षण घ्यावे लागले आहे.”हाके म्हणाले की, हल्लेखोरांवर कारवाई झाली नसती तर त्यांना पोलीस संरक्षण घेण्याची गरजच पडली नसती. पोलिसांच्या उपस्थितीतही हल्ला झाला, ज्यातून लक्ष्मण हाके यांनी असा इशारा दिला की, “या लोकांना वर्दीची भीती नाही आणि अजून अनेकांवर हल्ला करतील.”हाके यांनी या हल्ल्याचे कारणही स्पष्ट केले, “हे लोक सांगत आहेत की अंतर्गत विवाहाबद्दल बोलल्यामुळे माझ्यावर हल्ला केला. त्यांना माहित नाही की छत्रपती शाहू महाराजांनी शंभर पेक्षा अधिक आंतरजातीय विवाहांना परवानगी दिली होती. सामाजिक न्यायासाठी लढणाऱ्या ओबीसी समाजासाठी महाराष्ट्रात अजूनही ५० ते ६० टक्के लोक मुख्य प्रवाहाबाहेर आहेत.”पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी लक्ष्मण हाके पाथर्डीकडे जात असताना अहिल्यानगर बायपास रोडवरील एका रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करण्यासाठी थांबले. नाश्त्यानंतर परत जात असताना काही इसमांनी त्यांच्या गाडीवर काठ्यांनी हल्ला केला. हल्ल्यात १०-१२ जण सहभागी होते आणि पोलिसांच्या दोन गाड्या सोबत असतानाही त्यांनी दोन-तीन फुटांचे बांबू वापरून हल्ला केला. लक्ष्मण हाके म्हणाले, “दहा सेकंद उशीर झाला असता तर बांबू थेट आमच्या डोक्यात बसले असते.” या हल्ल्यात त्यांच्या एका सहकाऱ्याचे हात-पाय फ्रॅक्चर झाले असून डोक्यालाही धक्का बसला.पोलीसांनी तत्काळ हस्तक्षेप करून हाके यांना सुरक्षित बाहेर काढले, तर हल्लेखोरांपैकी तीन जणांना ताब्यात घेऊन नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
read also : https://ajinkyabharat.com/table-vijay-bhagunik/