‘कार ऑन ट्रेन’ सेवा सुरु; ७८७५ रुपये देऊन कारसोबत कोकणात जाता येणार

'कार ऑन ट्रेन' सेवा सुरु; ७८७५ रुपये देऊन कारसोबत कोकणात जाता येणार

मुंबई | प्रतिनिधी

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

यंदाच्या गणेशोत्सवात कोकण रेल्वेने ‘कार ऑन ट्रेन’ सेवा सुरु केली असून,

आता स्वतःची कार ट्रेनमध्ये टाकून थेट कोकणात जाता येणार आहे.

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी एका कारसाठी ७,८७५ रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

या सेवेसह कारमालकासोबत ३ प्रवाशांना एसी कोच किंवा एसएलआर डब्यात प्रवास करण्याची मुभा दिली जाणार आहे.

कार नेण्यासाठी प्रवासाच्या किमान तीन तास आधी स्टेशनवर उपस्थित राहणे आवश्यक आहे.

ही बहुप्रतीक्षित सेवा २३ ऑगस्ट २०२५ पासून कोलाड (महाराष्ट्र) येथून आणि २४ ऑगस्टपासून वेरणा (गोवा) येथून सुरु होणार आहे.

सेवा ११ सप्टेंबर २०२५ पर्यंत सुरु राहणार आहे. बुकिंगची प्रक्रिया २१ जुलैपासून ते १३ ऑगस्ट २०२५ पर्यंत सुरु राहणार आहे.

दरवर्षी कोकणात लाखो भाविक गणपतीसाठी येतात, आणि मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेमुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.

अशा परिस्थितीत ‘कार ऑन ट्रेन’ ही सेवा वेळ, इंधन आणि मानसिक त्रास वाचवणारी ठरणार आहे.

रेल्वे, एसटी, खासगी बस, समुद्रमार्गानंतर आता ‘कार ऑन ट्रेन’ हा एक नवा पर्याय

चाकरमान्यांना उपलब्ध झाला असून, ही सेवा कितपत यशस्वी ठरेल हे येणारा काळच ठरवेल.

Read Also :  https://ajinkyabharat.com/punyashlok-ahilyadevi-hokar-yanchaya-radhyal-postvron-sum/