कॅप्टन सुनिल डोबाळे यांच्या गावात वृक्षारोपण

पोलिसांनी पर्यावरण रक्षणासाठी उचलला पुढाकार

अकोट:  उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) निखिल पाटील, पोलीस निरीक्षक (ग्रामीण) किशोर जुनगरे, उप पोलीस निरीक्षक सौ. काटोले व पोलीस दलातील अनेक कर्मचाऱ्यांनी अकोट तालुक्यातील ताजनापुर व वडगांव ग्रामपंचायत क्षेत्रात वृक्षारोपण केले.

या मोहीमेअंतर्गत वृक्षारोपणानंतर झालेल्या स्वागत समारंभात कॅप्टन सुनिल डोबाळे यांनी SDP0 निखिल पाटील व पोलीस कर्मचार्‍यांचे पुष्पगुच्छाने स्वागत केले. ठाणेदार किशोर जुनगरे यांचेही स्वागत सरपंच विलास मेंढे यांच्या हस्ते करण्यात आले.

कॅप्टन डोबाळे यांनी गावाच्या निवडीबाबत पोलीस प्रशासनाचे आभार मानले व सर्व गावकऱ्यांनी वृक्षांचे संवर्धन करावे व याचा फॉलोअप दरवर्षी पाठविला जाईल याची ग्वाही दिली.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व गावकऱ्यांनी पोलीस प्रशासनाच्या सहकार्याचे कौतुक करत आभार मानले.

read also :https://ajinkyabharat.com/aditi-tatkare-yancha-call/