देशभरात भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनाची तयारी सुरू असतानाच
जम्मू काश्मीरमधून एक दु:खद बातमी समोर आली आहे.
जम्मू काश्मीरच्या दोडा येथील पटनीटॉप जंगलात दहशतवाद्यांशी
Related News
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
बीअरच्या बाटलीने ३६ वार:
चित्तौडगडमध्ये ‘द बर्निंग कार’! कलेक्ट्रेटजवळ उभी असलेली कार पेटली
“अंबाजोगाईत वकिल महिला बळी ठरली एका कटाचा?
लढताना भारतीय सैन्याच्या कॅप्टनला वीरमरण प्राप्त झाले आहे.
सैन्य दलाच्या पथकाने या चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचीही माहिती आहे.
कॅप्टन दीपक हे आपल्या पथकाच्या नेतृत्वात या दहशतवाद्यांशी लढत असताना
दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात भारतामातेनं आपला पुत्र गमावला आहे.
दहशवाद्यांशी गोळी लागल्यानंतरही कॅप्टन दीपक त्यांचा सामना करत होते.
भारतीय सैन्याचे जवान आणि दहशतवादी यांच्यातील चकमकीत
गोळी लागल्यानंतर कॅप्टन दीपक यांना त्यांच्या पथकाने रुग्णालयात दाखल केले.
मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पटनीटॉप जंगलातील
अकर क्षेत्रातील एका नदीकिनारी लपलेल्या दहशतवाद्यांनी हा भ्याड हल्ला केला.
बुधवारी सकाळी एन्काऊंटर करण्यात येत असलेल्या जागेवर
आपली शस्त्र टाकून दहशतवाद्यांनी तेथून पळ काढला.
घटनास्थळावरुन अमेरिका एम 4 रायफलही जप्त करण्यात आली असून
तीन बॅगेतून स्फोटकेही जप्त करण्यात आली होती. दरम्यान,
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राजधानी दिल्ली दहशवाद्यांच्या घटनांवरुन
बैठका सुरू असून गुप्तचर यंत्रणांना अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/maji-sainikwar-attack-case-citizens-police-stationwar-morcha/