स्तनपान किंवा बाळाला झोपवताना अनेक महिला फोनमध्ये व्यस्त राहतात, ही सवय बाळाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. तज्ज्ञांचा दावा आहे की फोनमधून निघणारे रेडिएशन आणि उष्णता बाळाच्या मेंदूच्या आणि शारीरिक विकासावर नकारात्मक परिणाम करू शकतात.
विशेषतः पहिल्या दोन वर्षांत बाळाचा मेंदू आणि शरीराचा विकास होतो, त्यामुळे या काळात अतिरिक्त काळजी घेणे गरजेचे आहे. सतत रेडिएशनच्या संपर्कामुळे बाळाचे झोपेचे चक्र बिघडते, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, वर्तनातील समस्या निर्माण होतात आणि भविष्यात कॅन्सरचा धोका वाढतो.
डॉक्टरांचा सल्ला: बाळाजवळ फोनचा वापर टाळावा, स्तनपान आणि झोपवण्याच्या वेळात फक्त बाळावर लक्ष केंद्रित करावे. आईसाठीही हा काळ आरामाचा असावा, कारण सोशल मीडियाचा सतत वापर हार्मोनल समस्या आणि तणाव वाढवतो.
read also :https://ajinkyabharat.com/navanachya-pahiya-lagnat-shubhecha-danari/
