आशिया कप 2025 मधील भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी राजकीय व वैयक्तिक वाद उठले आहेत. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध तणावपूर्ण झाले आहेत. त्यामुळे भारतात पाकिस्तानविरुद्धचा सामना रद्द करावा अशी जोरदार मागणी होत आहे.
टाईम्स ऑफ इंडिया नुसार, भारताच्या ड्रेसिंग रूममध्येही संभ्रमाचे वातावरण आहे. प्रशिक्षक गौतम गंभीर आणि स्टाफ यांनी खेळाडूंसोबत चर्चेत सामना व्यावसायिक दृष्टीकोनातून खेळण्याचा सल्ला दिला आहे. परंतु सामाजिक आणि देशभक्तीच्या दृष्टीने खेळावं की नाही, हा प्रश्न संघात चर्चेचा विषय बनला आहे.
यावेळी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका करत भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानविरुद्ध सामना खेळणं म्हणजे शहिदांचा अपमान असल्याचं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रात ‘माझं कुंकू माझा देश’ आंदोलनही आयोजित करण्यात आलं आहे. कोल्हापूरमधील हॉटेल मालकांना सामना न दाखवण्याचं आवाहन करण्यात आलंय.
भारत आणि पाकिस्तानचा संपूर्ण संघ
भारत संघ:
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, अभिषेक शर्मा, टिळक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, हर्षित राणा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (विकेटकीपर)
पाकिस्तान संघ:
सलमान आगा (कर्णधार), अबरार अहमद, फहीम अश्रफ, फखर जमान, हारिस रौफ, हसन अली, हसन नवाज, हुसैन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद हरीस (विकेटकीपर), मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम, साहिबजादा फरहान, सैम अय्युब, सलमान मिर्झा, शाहीन शाह आफ्रिदी, सुफन शाह
पुढील घडामोडी कशा?
ही सामन्याची तयारी अत्यंत संवेदनशील वातावरणात सुरु असून, सामना सुरू होणार की रद्द होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान सामना मैदानावर रंगणार असल्यामुळे चर्चेला अधिक उभारी मिळाली आहे.
सरकारचे आणि क्रिकेट मंडळाचे पुढचे पाऊल, संघाची प्रतिक्रिया आणि सामाजिक स्तरावर होणाऱ्या आंदोलना यावर लक्ष ठेवले जाणार आहे.
read also :https://ajinkyabharat.com/lakhs-of-lok-rastyavar-utlale-anti-riot-path-posted/