स्कूल बस चालकाच घाणेरडे कृत
चंदन जंजाळ
बाळापूर ताप्र:- देगाव येथील शाळेकरी बस चालक गजानन समाधान भगत यांनी दोन ८ वर्षीय प्रवाशी विद्यार्थ्यांसोबत
वेगवेगळ्या दिवशी विनयभंग केल्याचे कृत समोर आले आरोपी आपली बस देगाव ते वाडेगाव व देगाव ते खिरपूरी
येथे विद्यार्थ्याला शाळेत ने आण करत असतो पालक आपल्या पाल्याला बस चालकाच्या विश्वासावर शाळेत
पाठवत असतात आणि असे प्रकार घडले तर कुणावर विश्वास ठेवावा आरोपीने लहान बालकाला
आपल्या घरी दि ०२ ०८ २५, १० ३० वाजता बोलावून तुला कांचोड्या देतो म्हणून असे आमीष देऊन घरी बोलावले
व वाईट कृत उदेशाने अंगावरुण हात फिरविल्याच्या तक्रार बाळापूर पोस्टे येथे दि ० ३ ऑगस्ट रोजी दुपारी २, १६ वाजता
गुन्हा दाखल केल्या नंतर आरोपीला अटक करण्यात आली गुन्हा क्र ३७३ / २५, ७४, ७६, ३५१ (२ ),३५२ भदवि
कलमसह ८, १२ पोक्सो दाखल करण्यात आला पुढील तपास ए पि आय सुरोशे यांच्या मार्गदर्शनात ए एस आय शिवकुमार वर्मा करीत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/akola-polis-dalakdoon-operation-prahar-took-100-ismon-action/
