मिशन परिवर्तन अंतर्गत बुलढाणा पोलिसांचा उपक्रम, शेगावात रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

बुलढाणा पोलिसांचा समाजसेवेचा आदर्श

शेगाव  – बुलढाणा जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांच्या

“मिशन परिवर्तन” या उपक्रमांतर्गत शेगावात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

“आओ लिखे मानवता की नई परिभाषा, रक्तदान कर दे जीवन को नई आशा”

या संदेशाने आयोजित या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शेगाव ग्रामीण व शहर पोलीस स्टेशन तसेच पोलिस मित्र परिवार

यांच्या पुढाकारातून कुणबी समाज भवन येथे आयोजित

शिबिरात तब्बल २६९ नागरिकांनी रक्तदान करून समाजसेवेचा आदर्श ठेवला.

यामध्ये महिलांचा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला.

कार्यक्रमास मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांनी भेट देऊन

रक्तदात्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचाही संदेश दिला.

आतापर्यंत शेगावात झालेल्या रक्तदान शिबिरांमध्ये हा सर्वाधिक रक्तदात्यांचा विक्रम ठरला आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालय, अकोला व सईबाई मोटे रुग्णालय,

शेगाव येथील डॉक्टर्स व पथकांनी शिबिरासाठी सहकार्य केले.

तर समाजसेवक दयारामभाऊ वानखेडे यांनी सभागृह उपलब्ध

करून दिल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.

जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेला पोलिस दल,

पत्रकार बांधव, नागरिक आणि विविध धर्मीय समाजघटकांचा

मोठा प्रतिसाद मिळाल्याने हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

Read also :https://ajinkyabharat.com/delhi-t20-legamidhy-wants-jhale-fida/