बसपाच्या अध्यक्षपदी मायावती यांची एकमताने फेरनिवड

बसपाच्या

बसपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक मंगळवारी पार पडली.

ज्यामध्ये मायावती यांची पुन्हा एकदा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी

एकमताने निवड करण्यात आली आहे. सप्टेंबर 2003 पासून त्या

Related News

पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा होत्या. बैठकीत पक्षाचे सरचिटणीस

सतीश चंद्र मिश्रा यांनी मायावती यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आणि

सर्वांनी एकमताने ते मान्य केले. तत्पूर्वी, त्यांच्या निवृत्तीबाबत सुरू असलेल्या

अटकळांना पूर्णविराम देत मायावतींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट X वर

लिहिले की, माझ्या सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

माझ्या गैरहजेरीत किंवा प्रकृती अस्वास्थ्यामुळे पक्षाने श्री आकाश आनंद

यांना उत्तराधिकारी म्हणून पुढे केले, अशा खोट्या बातम्यांपासून दूर राहावे,

जातीयवादी प्रसारमाध्यमे अशा बातम्या पसरवत आहेत’, असे त्यांनी लिहिले आहे.

या बैठकीत अनेक राज्यांची जबाबदारी राष्ट्रीय समन्वयक आकाश आनंद यांच्याकडे

सोपवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. यामध्ये यूपी, एमपी, दिल्लीसह

निवडणूक राज्य हरियाणाच्या नावांचा समावेश आहे. आकाश निवडणुकीच्या

राज्यांमध्ये प्रचाराची धुरा सांभाळणार असून संघटना मजबूत करण्यासाठी काम करणार आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/street-vendor-committee-member-election-2024-reservation-sodat-completed%e0%a4%aa%e0%a4%a5-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%a4/

Related News