बायपास सर्जरी नंतर BSNL कर्मचाऱ्याचा मृत्यू.

बायपास सर्जरी नंतर BSNL कर्मचाऱ्याचा मृत्यू.

हिवरखेड प्रतिनिधी :-
हिवरखेड BSNL कार्यालयाचे वरिष्ठ कर्मचारी, मनमिळाऊ व्यक्तिमत्व माताप्रसादजी दोहरे

यांचे बायपास सर्जरी, हृदयविकाराच्या शस्त्रक्रियेनंतर दिनांक 1 जानेवारी रोजी संध्याकाळी

अमरावती येथील रुग्णालयात दुःखद निधन झाले.
दि. 2 जानेवारी गुरुवार रोजी सायंकाळी त्यांची अंतिम यात्रा त्यांच्या राहते घर गाडगे नगर

Related News

हिवरखेड येथून निघाली. अकोट रोडवरील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.

माताप्रसाद दोहरे हे मूळचे ओरैय्या उत्तर प्रदेश येथील राहणारे होते. परंतु अनेक वर्षांपासून ते हिवरखेड

येथील BSNL कार्यालयात कार्यरत होते. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुली, दोन मुले, आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे.

त्यांच्या अंत्ययात्रेत गावातील गणमान्य व्यक्ती, नातलग, तसेच बीएसएनएल चे वरिष्ठ अधिकारी हजर होते.

 

 

Related News