ब्रिटन थेट हवाई रक्षणासाठी मैदानात

रशियन ड्रोन पोलंडमध्ये घुसले

युक्रेन-रशिया युद्ध अधिकच तणावग्रस्त होत असताना, रशियाच्या काही ड्रोनने पोलंडच्या हवाई हद्दीत प्रवेश केला आणि एकच खळबळ उडाली आहे. पोलंड या घुसखोरीला थेट प्रत्युत्तर देऊ शकले नाही, त्यामुळे नाटो सदस्य देशांमध्ये तातडीची बैठक बोलावण्यात आली.

पोलंडच्या हवाई हद्दीचे रक्षण करण्यासाठी डेन्मार्क, जर्मनी आणि फ्रान्स पुढे आले, तर आता ब्रिटनही पोलंडच्या मदतीसाठी मैदानात उतरत आहे. ब्रिटिश रॉयल एअर फोर्सच्या लढाऊ विमानांना पोलंडच्या हवाई हद्दीचे संरक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे ब्रिटिश संरक्षण मंत्री जॉन हीली यांनी सांगितले. टायफून लढाऊ विमाने लिंकनशायरमधील आरएएफ कोनिंग्सबी येथून उड्डाण करतील.

ही घुसखोरी नाटो सदस्य देशाच्या हवाई क्षेत्रात झाल्यामुळे गंभीर समजली जात आहे. नाटो आता पोलंडचे रक्षण करून रशियाला सामूहिक प्रत्युत्तर देईल, असेही हीली यांनी स्पष्ट केले.

पोलंडने या घटनेवर निषेध नोंदवत जोरदार टीका केली आहे आणि असेही सांगितले की त्यांनी रशियन ड्रोन पाडले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही रशियाची चूक असू शकते असे म्हटले, मात्र पोलंडने या विधानाचा त्वरित निषेध केला.

युक्रेन आणि रशिया युद्धाचे वातावरण तणावपूर्ण आहे, तर रशियावर अमेरिका थेट कारवाई करत नसल्याने, तेल खरेदी करणाऱ्या देशांवर निर्बंध लादले जात आहेत. पोलंडच्या हवाई हद्दीत झालेल्या रशियन ड्रोनच्या घुसखोरीनंतर ही घडामोडी नाटोच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या ठरल्या आहेत.

read also :https://ajinkyabharat.com/india-america-turiff-fight/