अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ब्रिटन दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकार परिषदेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर थेट टीका केली. “मला पुतिन यांच्यावर खूप निराशा आहे. मी अध्यक्ष झाल्यावर सर्वप्रथम रशिया-युक्रेन युद्ध संपवण्याचा विचार केला होता. पण आज परिस्थिती वेगळी आहे. पुतिन हे युद्ध थांबवण्याऐवजी अधिकाधिक लोक मारत आहेत,” असे ट्रम्प म्हणाले.
ट्रम्प यांनी यावेळी केवळ पुतिनच नव्हे, तर भारत, चीन यांनाही युक्रेन-रशिया युद्धासाठी जबाबदार ठरवले. त्यांच्या मते, भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करून त्यावर प्रक्रिया करून जगभरात विकतो. या व्यापारातून मिळालेला पैसा रशियाला शस्त्रास्त्रे खरेदीसाठी उपयोगी पडतो आणि युक्रेनमध्ये नागरिकांचे जीव जातात, असा आरोप त्यांनी केला.
ट्रम्प म्हणाले, “भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी. तसे झाले तर आम्ही भारतावरील 25 टक्के टॅरिफ लगेच हटवू.” पण भारताने अमेरिकेच्या अटी मान्य न करता रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवली आहे, असेही ते म्हणाले.
ट्रम्प यांनी यापूर्वी विद्यमान अध्यक्ष जो बायडेन यांना या युद्धासाठी जबाबदार ठरवले होते. आता मात्र त्यांनी पुतिन आणि भारतावरही बोट ठेवले आहे. “युक्रेन-रशिया युद्ध संपवण्यासाठी मार्ग दिल्लीहून जातो,” असे वक्तव्य करून त्यांनी आंतरराष्ट्रीय वर्तुळात नवा वाद निर्माण केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रम्प भारतावर दबाव टाकण्यासाठी पाकिस्तान आणि बांगलादेशासोबत हातमिळवणी करण्याच्या प्रयत्नात असल्याचे समजते. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांमध्ये नवीन तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात
read also :https://ajinkyabharat.com/pantpradhan-modi-yanchaya-vadddivasimit-seva-pandharwada-program/