अकोला | प्रतिनिधी
बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर मार्गावर गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एक भीषण अपघात घडला.
भरधाव चारचाकीने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाले.
ही घटना वरखेड फाट्यानजीक घडली असून, परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अपघातानंतर संतप्त जमावाने चारचाकी वाहनाची जोरदार तोडफोड केली.
काही वेळातच दोन गट आमनेसामने उभे ठाकले आणि परिस्थिती अधिकच चिघळली.
पत्रकारांवरही जमावाने धाव घेतल्याने अनेक पत्रकारांना जीव वाचवण्यासाठी घटनास्थळावरून पळावे लागले.
या घटनेची माहिती मिळताच बार्शीटाकळी पोलिसांचा ताफा घटनास्थळी
दाखल झाला असून, पोलीस परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
दरम्यान, अपघातात कारणीभूत ठरलेली चारचाकी एम.आर. असलेल्या एका युवकाची असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
पुढील तपास पोलीस करत आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/decay-mukti-karita-gavakyancha-sankalp/