अकोला – कंझरा गावाजवळील कमळगंगा नदीत २९ ऑगस्ट रोजी
वाहून गेलेली रेखा रमेश मते यांचा मृतदेह आज,
३१ ऑगस्ट दुपारी सुमारे ३ वाजता, अखेर सापडला.
रामखेड येथील ४ नं. बंधाऱ्याजवळील वीर भगतसिंग आपत्कालीन पथक
(कुरणखेड), गाडगे महाराज पथक (पिंजर)
व माँ चंडिका पथक (पैलपाडा) यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे या मोहिमेला यश मिळाले.
गेल्या तीन दिवसांपासून युद्धपातळीवर सुरू असलेल्या शोधकार्याच्या
दरम्यान नदीतून मृतदेह शोधण्याचे प्रयत्न सातत्याने चालू होते.
स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन पथकाच्या
सतत प्रयत्नांमुळे अखेर या कठीण कामात यश मिळाले.
घटनास्थळी पोहोचलेल्या स्थानिक रहिवाशांनी आणि परिजनांनी या कामगिरीचे कौतुक केले.
घटनास्थळी मृतदेह ओळखल्यानंतर पोलीस
तसेच स्थानिक प्रशासनाने पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.
या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून,
परिजनांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत
Read also : https://ajinkyabharat.com/mana-dhirat-budalali-tarunacha-deaddeh-don-doni-doni-shahapur-yehethe-sapadla/