🇮🇳 भारताचा चीनला मोठा धक्का !
भारताने संरक्षण क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा आणखी मोठा पैलू समोर आला आहे. आता भारत चीनच्या शेजारील देश फिलीपिन्सला ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र देणार असल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे चीनच्या रणनीतीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
भारत-फिलीपिन्स कराराचा इतिहास:
2022 मध्ये भारत आणि फिलीपिन्स यांच्यात 375 दशलक्ष डॉलर्सचा संरक्षण करार झाला होता. त्याअंतर्गत भारताने आतापर्यंत दोन खेप ब्रह्मोस क्षेपणास्त्रांची फिलीपिन्सला सुपूर्त केली आहे. आता लवकरच तिसरी खेपही दिली जाणार आहे. ब्रह्मोस एरोस्पेसचे CEO जयतीर्थ जोशी यांनी पत्रकारांना सांगितले की,
“रॉकेट्स तयार आहेत आणि वेळेवर पोहोचवले जातील.”
चीन-फिलीपिन्स संबंधात तणाव:
चीन आणि फिलीपिन्समधील समुद्रातील वादग्रस्त भागावर तणाव वाढलेला आहे. चीन या भागावर आपला हक्क सांगत असून, पूर्वीही दोन्ही देशांमध्ये वाद झालेले आहेत. आता भारताकडून फिलीपिन्सला ब्रह्मोस मिसाईल पाठवल्याने फिलीपिन्सच्या संरक्षण सामर्थ्यात मोठी भर पडणार आहे. फिलीपिन्स या मिसाईल्सचा उपयोग भविष्यातील धोके टाळण्यासाठी आपल्या किनारी भागात तैनात करणार असल्याची माहितीही समोर आली आहे.
ब्रह्मोस मिसाईलचे वैशिष्ट्य:
सुपरसॉनिक (आवाजाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने उडणारे)
रेंज – 800 किलोमीटर
लक्ष्य निश्चित झाल्यावर मानवी हस्तक्षेपाची गरज नसते
ऑपरेशन सिंदूरमध्ये रावळपिंडी, सरगोधा, भोलारी आणि नूर खान हवाई तळांवर याचा उपयोग करण्यात आला होता.
या रणनीतीमुळे भारताचा सामरिक सामर्थ्य आणखी वाढणार असून, चीनसाठी मोठा आव्हान निर्माण होणार आहे.
read also : https://ajinkyabharat.com/khasar-praniti-shinde-commissioner-bhadkalya/