ब्रह्मकुमारी हिरपूर शाखेत रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न

ब्रह्मकुमारी हिरपूर शाखेत रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न

हिरपूर (प्रतिनिधी) –ब्रह्मकुमारी हिरपूर शाखेत रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न

बंधुत्व, पवित्रता आणि आत्मिक एकतेचा संदेश देणारा रक्षाबंधन सोहळा ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, हिरपूर शाखेच्या वतीने भावपूर्ण आणि आध्यात्मिक वातावरणात साजरा करण्यात आला.

या प्रसंगी राज योगिनी सुनंदा दीदी व ब्रह्माकुमारी कस्तुरी सुनंदा दीदी यांनी राखी व रक्षाबंधनाविषयी प्रेरणादायी विचार मांडले.

दीदींनी सांगितले –”राखी हे फक्त धाग्याचे बंधन नसून, ते आत्मिक नात्यांचे, पवित्रतेचे आणि जबाबदारीचे प्रतीक आहे.

हा सण आपल्यातील विश्वास, प्रेम आणि सन्मान अधिक दृढ करण्याची संधी देतो.”

यावेळी उपस्थितांना राजयोग ध्यानाचे महत्त्व पटवून देत, अंतःशांती, सकारात्मक विचार आणि दैवी गुण आत्मसात करण्याचे आवाहन करण्यात आले.

भाविक, महिला, युवक आणि लहान मुलांनी उत्साहाने राख्या बांधून एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाला ब्रह्माकुमार राजेश भाई, ब्रह्माकुमार प्रवीण भाई, ब्रह्माकुमार अमरनाथ भाई, पुंडलिक महाराज संस्थानचे अध्यक्ष विठ्ठलराव पातोंड, मधापुरी सरपंच सौ. अंजलीताई ठाकरे,

सौ. आरती पोळकट (ग्रामीण महिला तालुकाध्यक्ष – भाजप), अॅड. रमेश फडनाईक, अंजन डे, विष्णू भाई, तसेच पत्रकार विलास नसले आणि दिलीप तिहिले यांची मान्यवर उपस्थिती लाभली.

तसेच सौ. मीनाताई तिहिले, मुक्ता दीदी, श्री. गजानन गावंडे (पोलीस पाटील), देवानंद भाई, ज्ञानेश्वर भाई, आशिष गावंडे, संदीप मेहरे, चंदू ढवळे, माधव फडनाईक, संजय फडनाईक, गजानन चौधरी, मोहन डहाके,रामकृष्ण आगाशे,

अरुण माकोडे यांच्या उपस्थितीत सोहळा अधिक मंगलमय झाला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वंदना टीके, छाया गावंडे, सीता गुल्हाने, जया कुलकर्णी, कमला गुल्हाने, स्वाती राजगुरे, रत्ना गुल्हाने, मेहरे माता, रजनी बानुवाकोडे, सोपानभाई, गजाननभाई यांनी परिश्रम घेतले.

हिरपूर शाखेच्या बहिणींनी सादर केलेल्या सांस्कृतिक व आध्यात्मिक कार्यक्रमांनी वातावरण अधिक मंगलमय केले.

कार्यक्रमानंतर श्री. माधव फडनाईक यांच्यातर्फे सर्वांना ब्रह्मभोजन देण्यात आले.

पवित्रतेचा, बंधुत्वाचा आणि आत्मिक एकतेचा संदेश देत हा सोहळा उत्साह, आनंद वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुक्ता दीदी यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रवीण ढगे यांनी मानले.

READ ALSO :https://ajinkyabharat.com/raheer-yehehe-har-har-mahadev/