बॉक्सिंग स्पर्धेत दमदार यश!

घामाचे मोती झाले सुवर्णपदकात रूपांतर

पातुर:क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला यांच्या वतीने आयोजित 19 वर्षांखालील मुलांची जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजी वसंत देसाई क्रीडांगण, अकोला येथे उत्साहात पार पडली. या स्पर्धेत श्री सुधाकरराव नाईक कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, शेकापूर फाटा, कार्ला येथील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत एकूण तीन सुवर्णपदके आणि तीन रजत पदके पटकावत महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे.

स्पर्धेतील विजेते विद्यार्थी :
अमोल चव्हाण – सुवर्णपदक
स्वप्निल जाधव – सुवर्णपदक
आदित्य इंगळे – सुवर्णपदक
प्रज्वल इंगळे – रजत पदक
सौरव सुलताने – रजत पदक
हर्षल राठोड – रजत पदक

या सर्व खेळाडूंनी आपापल्या वजनगटांमध्ये सुरुवातीपासूनच दमदार खेळी करत प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केले आणि अंतिम फेरीत आत्मविश्वास व कौशल्य दाखवत पदके मिळवली.  या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांच्या मेहनतीबरोबरच महाविद्यालयाचे प्राचार्य नारायण वायाळ सर, मुख्याध्यापक एन. के. नारायण राठोड सर, मुख्याध्यापिका अनिता इंगळे मॅडम, तसेच बॉक्सिंग प्रशिक्षक राहुल शेगोकार सर यांच्या मार्गदर्शनास आणि पालकांच्या सहकार्याला जाते.  महाविद्यालयाचे संस्थाचालक श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सचिव श्री रामसिंगजी जाधव साहेब तसेच सर्व शिक्षक, कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

read also:https://ajinkyabharat.com/japa-shahet-newly-elected-teacher-hospitality/