हिवरखेड :पोलिस स्टेशन हद्दीतील ग्राम तलई येथे पोलीसांनी गुप्त माहितीच्या आधारे ८ आगस्ट रोजी गावठी हातभटट्टीवर धाड
टाकून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत एकुण २ आरोपींवर कार्यवाही करून १४६७० रू चा मुददेमाल हस्तगत आहे .
पोलिस सूत्राकडून प्राप्त माहिती नुसार ,पोलिसांनी कालूराम नेमा धारवा रा. ग्राम तलई यांचे ताब्यातून
मोहमा सडवा अंदाजे किलो किंमत ११२५० रू.गावठी हातभटट्टीची दारू १५ लिटर किंमत अंदाजे १५०० रू. असा एकुण १२७५० रू. चा मुदद्देमाल
मिळुन आल्याने पंचा समक्ष जप्त केला .ग्राम पिंपरखेड ता. तेल्हारा बाबुलाल राजू कासदेकर ताब्यातुन देषी दारू
लावणी संत्रा १८० मि.ली. चे २४ नग क्वार्टर कीं. १९२० रू चा माल जप्त करण्यात आला आहे.
अवैध गावठी दारूसह मुद्देमाल मिळून आल्याने तो पंचा समक्ष जप्त करून दोन्ही
आरोपीविरुद्ध पोलिसांनी पो.स्टे. कलम ६५ क, ड, ई महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई हिवरखेड पोलिसांनी पोलीस अधीक्षक अकोला यांचे निर्देशा प्रमाणे अकोला जिल्हयामध्ये अवैध
धंदयांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ऑपरेशन प्रहार अंतर्गत राबविण्यात आली आहे.
तसेच पुढील घटनेचा तपास पोलिस करत आहेत.
Read Also :https://ajinkyabharat.com/tamsit-cylinder-explosion/