कारंजा लाड- ग्रामातील मंदिराच्या दुरुस्ती व विकासकामांसाठी तब्बल दोन कोटी रुपयांचा खर्च झाला असतानाही कामाच्या दर्जाबाबत गंभीर तक्रारी
समोर आल्या आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी साचत असल्याने भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून ग्रामस्थांनी या प्रकरणाची
तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे.
गाभाऱ्यात सतत पाणी, भाविक त्रस्त
ग्रामस्थांच्या मते, ठाकरे इजी सभागृहातील फरशी धुतल्यावरचे पाणी बाहेर न जाता मंदिराच्या आत झिरपत आहे. त्यामुळे गाभाऱ्यात नेहमी ओलसरपणा
राहतो आणि धार्मिक वातावरण दूषित होत आहे.
दर्जाहीन कामांची भीती
मंदिरात बसवलेली जाड फरशी वजनामुळे कधीही कोसळू शकते, अशी भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
पुलाजवळील फिचिंगची कामे अपूर्ण राहिल्याने पावसाळ्यात पाणी साचून मोठा अनर्थ होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
“पुलावरून जाणारी वाहतूक धोक्यात आली आहे. दोन कोटी रुपये खर्चूनही अशी अवस्था असेल तर यात गंभीर अनियमितता झाली आहे,” असा आरोप ग्रामस्थांनी केला.
श्रावणात भाविकांना मोठा त्रास
श्रावण महिन्यात सोमवारी महिलांची आणि वृद्धांची मोठी गर्दी मंदिरात होत असते.
मात्र गळतीमुळे भाविकांना दर्शन घेताना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
चौकशी न झाल्यास आंदोलनाचा इशारा
ग्रामस्थांनी स्पष्ट केले की, “कामात मोठा गैरव्यवहार झाला असून दोषींवर कारवाई झाली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू,” असा इशारा त्यांनी दिला आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/akola-illegal-liquor-seller-mahilancha-morcha-shop/