हेडफोनने घेतले दोन जीव; महिला आणि सहकारी तरुणाचा रेल्वेखाली येऊन मृत्यू

हेडफोनने घेतले दोन जीव; महिला आणि सहकारी तरुणाचा रेल्वेखाली येऊन मृत्यू

अंबरनाथ |

रेल्वे रुळ ओलांडताना हेडफोनमुळे गोंधळलेली महिला आणि तिला वाचवण्यासाठी धावलेला

सहकारी तरुण दोघेही रेल्वेखाली येऊन जागीच ठार झाले.

रविवारी संध्याकाळी अंबरनाथमधील मोरीवली गावाजवळ ही दुर्दैवी घटना घडली.

वैशाली धोत्रे (४५) या हेडफोन घालून मोबाईलवर बोलत रेल्वे रूळ ओलांडत होत्या,

तेव्हा येणाऱ्या रेल्वेकडे त्यांचं लक्ष गेलं नाही. आवाज ऐकूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

त्यावेळी त्यांच्या सोबत असलेले आतिष आंबेकर (२९) त्यांना वाचवण्यासाठी पुढे धावले.

मात्र दोघांनाही ट्रेनने जोराची धडक दिली आणि घटनास्थळीच मृत्यू झाला.

दोघेही एका खासगी कंपनीत सहकारी होते.

या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मोबाईल

वापर आणि हेडफोन वापराबाबत अधिक सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/dhagfutisadhi-pavasane-lonar-talukay-hahakar-shatakyancha-moth-disadvantage/