दोन दिवसात भोंगे काढा, अन्यथा

धार्मिक स्थळांवरील विनापरवाना लावलेले भोंगे काढण्यासाठी सूचना

धार्मिक स्थळांवरील विनापरवाना लावलेले भोंगे काढण्यासाठी सूचना

उंबर्डा बाजार : (वार्ताहर)

कारंजा लाड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री प्रविण शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयाने निर्गमीत केलेल्या

आदेशानुसार विनापरवाना लावलेले सर्व भोंगे काढण्याच्या अनुषंगाने ग्रामीण पोलीस स्टेशन कारंजा येथे बैठक घेतली.

या बैठकीत धार्मिक स्थळांवर विना परवाना असलेले भोंगे दोन दिवसात काढण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत.

सदर बैठकीमध्ये मंदिर, मस्जीद, बौद्ध विहार येथील धर्मगुरु, अध्यक्ष, पदाधिकारी, मौलवी, भंतेजी तसेच सर्व शांतता समिती सदस्य, पत्रकार उपस्थित होते.

बैठकीमध्ये पोलीस महासंचालक यांचे स्थायी आदेश क्रमांक ०२/२०२५ अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकाची व ध्वनीप्रदूषण

अधिनियम कायद्याबाबतची माहिती देण्यात आली, तसेच महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व मार्गदर्शन सुचनेनुसार

आपण यापुढे परवानगी घेऊनच कायदेशीर बाबींची पूर्तता करूनच रितसर नियमानुसार पोलीस स्टेशनची परवानगी घेऊन

ध्वनीप्रदूषण कायद्याच्या नियमांचे पालन करून भोंगे लावावे. मंदिर, मस्जीद, बौद्ध विहार, गुरुद्वारा अशा ठिकाणी विनापरवानगी लावण्यात आलेले

भोंगे दोन दिवसामध्ये काढून घ्यावे, अशी सूचना उपस्थितांना देण्यात आली. ग्रामीण पोलीस स्टेशनतर्फे पथक नेमण्यात येणार आहे.

सदर पथक हे संपूर्ण कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत फिरणार आहे. सदर पथकाच्या निर्दशनास विनापरवानगी भोंगे

आढळून आल्यास संबंधित प्रार्थना स्थळावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे बैठकीत सांगण्यात आले.

Read Also : https://ajinkyabharat.com/union-minister-no-jadhavancha-interference-shiv-sena-jilhapramukh-pvt-bheram-maphriinian-movement-ishayamule-archaeological-department-narmal/