वाशिम : जिल्ह्यातील पोलीस स्टेशन अनसिंग हद्दीतील खडसिंग पुलाजवळ झालेल्या जबरी चोरी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेल वाशिमच्या संयुक्त कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.फिर्यादी ज्ञानेश्वर बाबाराव बांडगे (रा. लाखी, ता. पुसद, जि. यवतमाळ) यांनी फिर्याद दिली की, दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांना खडसिंग पुलाजवळ थांबवून मारहाण करून पैसे मागितले, पैसे न दिल्यामुळे त्यांचा मोबाईल जबरीने चोरला.स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेलच्या मदतीने सखोल तपास करत पोलीसांनी गोपनिय माहितीच्या आधारे पारडी आसरा फाट्यावर सापळा रचून आरोपी रमेश संतोष वाणी व अभिषेक कैलास वानखेडे यांना ताब्यात घेतले. दोन्ही आरोपी ग्राम पारडी आसरा येथील रहिवासी असल्याचे समोर आले.कडक चौकशीत त्यांनी अनसिंग येथील चोरीची कबुली दिली. शिवाय वाशिम जिल्ह्यातील जउळका व मंगरुळपीर पोलीस स्टेशनवरही चोरी केल्याची कबुली मिळाली. दोन्ही आरोपींकडून चोरी केलेला मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे.सदर प्रकरणी पुढील तपास सुरु असून, वाशिम जिल्ह्यातील नागरिकांकडून वाशिम पोलिसांचे कौतुक होत आहे.
दोन आरोपींना एलसीबी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

13
Sep