बोर्डी जि.प. आदर्श शाळेत ‘शास्त्रज्ञ आपल्या भेटीला’ कार्यशाळेचे आयोजन

बोर्डी जि.प. आदर्श शाळेत ‘शास्त्रज्ञ आपल्या भेटीला’ कार्यशाळेचे आयोजन

अकोट (दि. २७ मार्च २०२५): जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक मराठी शाळा,

बोर्डी येथे ‘National Eminent Expert’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी

‘शास्त्रज्ञ आपल्या भेटीला’ या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

Related News

या कार्यशाळेचे आयोजन अकोला जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ, कुतूहल संस्कार केंद्र

अकोला व जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक मराठी शाळा बोर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अकोला जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष रविंद्र भास्कर उपस्थित होते,

तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून नासाचे माजी एज्युकेटर व कुतूहल संस्कार केंद्राचे संस्थापक

डॉ. नितीन ओक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी

शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा वैशाली संतोष सोनवणे होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.

यानंतर शाळेच्या वतीने डॉ. नितीन ओक आणि रविंद्र भास्कर यांचे स्वागत संतोष सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.

विद्यार्थ्यांसाठी शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन

कार्यशाळेचे प्रास्ताविक व रूपरेषा शाळेचे मुख्याध्यापक उमेश चोरे यांनी सादर केली.

अकोला जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र भास्कर यांनी या कार्यशाळेच्या गरजेवर प्रकाश टाकला.

डॉ. नितीन ओक यांनी विद्यार्थ्यांना गणकयंत्र व संगणकापेक्षाही वेगवान पद्धतीने सोपी बेरीज,

वजाबाकी व गुणाकार करण्याच्या पद्धती PPT प्रेझेंटेशनच्या माध्यमातून शिकवल्या. तसेच,

अंतराळ, ग्रह, सूर्यमाला, चंद्रयान-३ मोहीम, लॅन्डर व रोव्हर यांच्या कार्यप्रणाली

यावर विस्तृत माहिती दिली. स्वतः तयार केलेल्या आकर्षक PPT

च्या मदतीने त्यांनी शास्त्रीय संकल्पनांचे सखोल विवेचन केले.

Related News