वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने रक्षाबंधन उत्सव साजरा
बोरगाव मंजू पोलिस ठाण्यात रक्षाबंधन साजरी.
वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर व राष्ट्रीय नेत्या प्रा.अंजलीताई आंबेडकर आणि महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकुर
यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन महिला आघाडीच्या ग्राम पंचायत देवळी येथील माजी सरपंच सौ. वैशाली विकास सदांशिव यांच्या नेतृत्वाखाली अकोला
जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलिस ठाण्यात पोलिस बंधु भगिनींना राखी बांधून रक्षाबंधन साजरी करण्यात आली.
नागरिकांच्या मानवी हक्कांचे रक्षण करण्याच्या त्यांच्या कर्तव्याची जाणीव करुन देण्यासाठी पोलिस भगिनी व भावांना वंचित बहुजन महिला
आघाडीच्या कार्यकर्त्या तथा ग्रा. पं. देवळी येथील माजी सरपंच सौ. वैशाली विकास सदांशिव, गट ग्रा. प. ढगा कोठारी येथील
सरपंच हेमलता सुनिल शिराळे, गट ग्रा. प. जवळा दोडकी सरपंच सौ. जयाताई गजानन चव्हाण, जवळा ग्रा. पं. सदस्य रंजनाताई गावंडे, संगीताताई खंडारे
यांनी बोरगाव मंजू येथील ठाणेदार अनिल गोपाल साहेब यांच्या पोलिस बंधु व भगिनींना राखी बांधली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हा महासचिव राजुमियॉं देशमुख, विकास सदांशिव, दिलीप शिरसाट, सुनिल शिराळे, रितेश किर्तक, माजी पं. स. सभापती राजेश वावकार हे उपस्थित होते.
Read also :https://ajinkyabharat.com/night-andhar-chorcha-tharar-ek-lakho-hahun-more-issue-lampas/