बोर्डीत गणेश उत्सव मिरवणूक शांततेत व उत्साहात संपन्न 

बोर्डीत सात गणेश मंडळांचा भक्तिमय मिरवणूक सोहळा

अकोट प्रतिनिधी – अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी व संत नागास्वामी महाराज यांच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या ग्राम बोर्डी येथे गणेश विसर्जन मिरवणूक काल शांततेत आणि मोठ्या उत्साहात पार पडली. या वर्षी एकूण ७ सार्वजनिक गणेश मंडळांनी विधिवतपणे सहभाग नोंदवून भक्तिमय वातावरणात गणेशोत्सव साजरा केला.

मिरवणुकीची सुरुवात व कार्यक्रमःसकाळी आठवडी बाजारातून वाजतगाजत व बँड पथकाच्या संगीताच्या सूरात मिरवणुकीला सुरुवात झाली. सातही ट्रॅक्टरवर गणेश मंडळांनी सजवलेल्या आराध्य गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात उत्साहपूर्वक मिरवणूक काढली. मिरवणुकीचे आयोजन ठरलेल्या वेळेनुसार सायंकाळी १० वाजता शांततेने पूर्ण झाले.

सहभागी गणेश मंडळे:
 नागास्वामी महाराज मंदिर
 मरी माता मंदिर
 दुर्गा माता मंदिर
 एकता गणेशोत्सव मंडळ
 वीर भगतसिंग गणेशोत्सव मंडळ
 आनंद बाल गणेश मंडळ
 शिवप्रेमी गणेश मंडळ

सुरक्षिततेची जबाबदारी:अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुनघरे यांच्या मार्गदर्शनात उमरा बिट जमदार उमेश सोळंके, महिला पोलिस कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांनी प्रत्येक गणेश मंडळावर कडक नजर ठेवून चोख बंदोबस्त केला. मिरवणूक दरम्यान कोणताही अप्रिय प्रकार घडू नये म्हणून सुरक्षा व्यवस्था प्रभावी रीत्या राबवण्यात आली.

उपस्थित मान्यवर:सातही गणेश मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, तंटामुक्तीचे अध्यक्ष, पत्रकार बांधव तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वांनी एकत्र येऊन शांततेत गणेशोत्सव साजरा केला व भक्तीभावनेने श्री गणेशाची पूजा-अर्चना केली.

अकोट ग्रामीण समाजाचे सौहार्द व भक्तीभावनेने साजरा करण्यात आलेले महापर्व हे सामाजिक ऐक्याचे उदाहरण ठरले आहे.

READ ALSO :https://ajinkyabharat.com/tanning/