बोलेरोत गोवंश कातडी वाहतूक जप्त – पोलिसांचा तडाखेबाज ‘ऑप्रेशन प्रहार’

बोलेरोत गोवंश कातडी वाहतूक जप्त – पोलिसांचा तडाखेबाज 'ऑप्रेशन प्रहार'

अकोला |
अमरावती-अकोला महामार्गावर गोवंश कातडी आणि चरबीच्या अवैध तस्करीवर अकोला पोलिसांनी

‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत जोरदार कारवाई केली. १४९ गोवंश कातडी,

२७ पिपे चरबी आणि बोलेरो पिकअपसह एकूण ५.४० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Related News

पोलिसांनी मोहम्मद शेख आरिफ (वय २०) आणि मोहम्मद हाशम शेख कासम (वय ३८)

या दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली.

ही धडाकेबाज कारवाई म्हणजे अकोला जिल्ह्यातील तस्करांसाठी एक इशारा ठरला आहे.

पोलिसांचे ऑपरेशन पुढेही अधिक तीव्र होणार असल्याची चिन्हं आहेत.

Read Also :  https://ajinkyabharat.com/junne-city-polysanni-motorial-choraas-betteed-don-motorcyli-seized/

Related News