बीएमसी आयुक्तांना थेट इशारा, आंदोलन शांततेत चालवा
मुंबई – मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील
आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनात
मराठा आंदोलकांनी शुक्रवारी रात्रभर छत्रपती शिवाजी टर्मिनस
(CSMT) स्थानकातील फलाटांवर झोप घेतली.
आज सकाळी आंदोलनस्थळी पाणी आणि स्वच्छतेची कमतरता लक्षात आली.
मुंबई महानगरपालिकेने परिसरातील हॉटेल्स
आणि खाऊगल्ली बंद ठेवण्याचे आदेश दिले,
ज्यामुळे आंदोलकांना पहिल्या दिवशीच अन्न आणि पाण्याचे प्रचंड अडथळे आले.
मनोज जरांगे पाटील यांचा इशारा
मनोज जरांगे पाटील यांनी बीएमसी आयुक्तांना थेट इशारा दिला आहे.
त्यांचे शब्द:
“आपण राजकारणासाठी आलो नाही, आरक्षण हवे आहे.
मुख्यमंत्र्यांना राजकारण करायचे आहे, आरक्षण देणे नाही.
आपले पोर अजिबात वाईट करणार नाहीत.
सर्व गाड्या सरकारने दिलेल्या मैदानावर ठेवा.
संयम बाळगा, शांत रहा.”
त्यांनी आंदोलकांना आवाहन केले की,
आंदोलन शांततेत पार पाडले पाहिजे आणि गोंधळ करणाऱ्यांना तडजोड करू नका.
“सगळ्या मुंबईत मराठे आले आहेत.
फक्त आपापले वाहने सुरक्षित लावा, पोरांना डिचवू नका,”
असेही त्यांनी स्पष्ट केले.
बीएमसी आयुक्तांना इशारा
जरांगे पाटील म्हणाले, “मुख्यमंत्र्यांचं आदेश ऐकून पाणी बंद केलं,
बाथरूम बंद केले, दुकाने बंद ठेवली.
सध्या तुम्ही मराठ्यांच्या पोरांच पाणी बंद केल ,
तरी कधी ना कधी बदल होणार. तुमचं नाव हिशोबात ठेवा.”
आंदोलन शांततेत चालवण्याचे आवाहन
मनोज जरांगे पाटील यांनी पोलिसांना देखील विनंती केली आहे की,
आंदोलकांना कोणताही ताण देऊ नका.
आंदोलनाची दिशा शांततेत ठेवा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/leo-today-namrata-and-soumik-vadhel/