“ब्लू ओरिजिन”ने रचला इतिहास; केटी पेरीसह ६ महिलांचा यशस्वी अंतराळ प्रवास

"ब्लू ओरिजिन"ने रचला इतिहास; केटी पेरीसह ६ महिलांचा यशस्वी अंतराळ प्रवास

अमेरिकन अब्जाधीश जेफ बेझोस यांच्या मालकीची ब्लू ओरिजिन या खासगी

अंतराळ संस्थेने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. ब्लू ओरिजिनच्या मिशन NS-31 अंतर्गत,

जेफ बेझोस यांची मंगेतर लॉरेन सांचेज आणि प्रसिद्ध पॉप स्टार केटी पेरी

Related News

यांच्यासह एकूण सहा महिलांनी यशस्वी अंतराळ प्रवास केला.

हा ऐतिहासिक अंतराळ प्रवास सोमवारी, १४ एप्रिल २०२५ रोजी पार पडला.

या मोहिमेसाठी ब्लू ओरिजिनच्या “न्यू शेपर्ड” या विशेष रॉकेटने पश्चिम टेक्सासमधून उड्डाण केलं.

या रॉकेटने सुमारे १०५ किलोमीटर उंचीवर झेप घेतली,

जिथे प्रवाशांना काही मिनिटांसाठी गुरुत्वाकर्षणमुक्त अनुभव घेता आला.

ही संपूर्ण अंतराळ सफर १० मिनिटांची होती आणि पूर्णतः स्वयंचलित प्रणालीने पार पडली.

यामुळे प्रवास अधिक सुरक्षित आणि अचूक झाला होता.

या मोहिमेचं वैशिष्ट्य म्हणजे, संपूर्ण अंतराळ सफरीत फक्त महिला सहभागी होत्या.

त्यामुळे हा प्रवास महिला अंतराळयात्रींसाठी एक प्रेरणादायी टप्पा ठरला आहे.

विज्ञान, अंतराळ संशोधन आणि महिलांच्या सहभागाच्या दृष्टीने ब्लू ओरिजिनचं हे पाऊल ऐतिहासिक मानलं जात आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/beed-jilha-rugnalayat-arogya-yogyancha-gambhir-bighad-atwadabharat-three-matchayu/

Related News