बदलापुरात दोन निरागस चिमुकल्यांवर एका नराधमानं अत्याचार केला.
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर संपूर्ण बदलापूर शहरात बंदची
हाक देण्यात आली होती. सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सर्व आंदोलक
Related News
श्रीराम नवमी निमित्त अकोला शहरात धार्मिक शोभायात्रेची जय्यत तयारी
लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिरमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
डोळ्यांखालील डार्क सर्कल्सने आहात हैराण? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय
करुणा व धनंजय मुंडे प्रकरणात नवीन वळण;
||देह वेचावा कारणीं|
अकोट येथे माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान
“बँकांमधील आंदोलन थांबवा” – उदय सामंत यांच्याशी भेटीनंतर राज ठाकरे यांचा मनसैनिकांना आदेश
शिर्डीत भिकाऱ्यांची मोहीम; “मी ISRO अधिकारी” म्हणताच पोलिसही गोंधळले!
अकोट शहर पोलिसांकडून मॉक ड्रिलचे प्रभावी सादरीकरण – सुरक्षा यंत्रणा सज्ज
रेल येथे महादेव-पार्वतीचा विवाह सोहळा
एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षेत माना विद्यालयाची परंपरा कायम
हातगावमध्ये धाडसी दरोडा : 65 ग्रॅम सोने व लाखोंची रोकड लंपास
शाळेबाहेर एकत्र जमले आणि आंदोलनाला सुरुवात झाली.
आक्रमक आंदोलकांनी बदलापूर रेल्वेस्थानकात जाऊन रेलरोको सुरू केला.
मध्य रेल्वेवरील कल्याण-कर्जत आणि अंबरनाथवरून बदलापूरकडे
जाणाऱ्या अप आणि डाऊन दोन्ही मार्गाच्या रेल्वे सेवा पूर्णपणे बंद असून
यामुळे कामावर जाणाऱ्यांचे हाल झाले खरे, पण आंदोलकांचं रौंद्ररुप
अनुभवायला मिळालं. याच प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गंभीर आरोप केला आहे.
बदलापूरच्या शाळेतील अत्याचार दडपण्याचा प्रयत्न करणारे लोक
भाजपचे असल्याचा थेट आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले की,
देशाच्या अनेक भागांत अशा दुर्दैवी घटना वारंवार घडत आहेत.
मात्र, काही राज्यात अशा घटना घडल्या तर त्याचा राजकारणासाठी
वापर केला जातो, असा नवा ट्रेंड सुरू झाला आहे. मला वाटतं की,
आपण आपल्या लाडक्या बहिणींसाठी योजना राबवतोच, पण त्याचबरोबर
त्यांच्या मुलींच्या सुरक्षेकडेही लक्ष दिलं पाहिजे. आपण फक्त काही
राज्यांनाच टार्गेट करून चालणार नाही, तर देशाच्या प्रत्येक भागांत
आपल्या मुलींचं रक्षण केलं पाहिजे आणि आरोपींवर त्वरित फास्ट ट्रॅक
कोर्टात कठोर कायदे करून कारवाई झाली पाहिजे.
तसेच, बदलापूरची शाळा भाजपच्या कोणत्या तरी कार्यकर्त्यांची असल्याचं
मला समजलं. मात्र, त्यात राजकारण आणण्याचा माझा हेतू नाही.
थोरात कोणत्याही पक्षाचे असोत त्यांना कायद्याच्या कक्षेत आणलंच पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/diabetics-should-take-care-during-rainy-season/