भाजपच्या माजी आमदाराने बांधले शिवबंधन!

शिवसेनेकडून

शिवसेनेकडून दोन वेळा आमदार राहिलेले रमेश कुथे यांची शिवसेना पक्षात घरवापसी

लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला चांगलं यश

मिळालं असून महाविकास आघाडीने तब्बल 30 जागा जिंकून

Related News

मोठा विजय मिळवला. त्यामध्ये, ठाकरेंच्या नेतृत्वातील

शिवसेनेचे 9 खासदार निवडून आल्याने उद्धव ठाकरेंसह

शिवसेना पदाधिकाऱ्यांचा उत्साह वाढला आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षातही इनकमिंग सुरू असून

काही दिवसांपूर्वीच पिंपरी चिंचवडमधील काही पदाधिकाऱ्यांनी ‘तुतारी’ हाती घेतली आहे.

त्यामुळे, महाविकास आघाडीच्या पक्षातील प्रमुख नेत्यांनी आता

विधानसभा निवडणुकांची रणनीती आखायला सुरुवात केली आहे.

त्याच पार्श्वभूमीवर पक्षप्रवेश केले जात आहेत.

आता, शिवसेनेला जय महाराष्ट्र केलेल्या माजी आमदाराने

पुन्हा घरवापसी करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे, गोंदियातील विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाची ताकद वाढणार आहे.

शिवसेनेकडून दोन वेळा आमदार राहिलेले रमेश कुथे यांनी

अखेर शिवसेना पक्षात घरवापसी केली आहे.

2019 मध्ये रमेश कुथे यांनी शिवसेना सोडत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.

आता सहा वर्षानंतर भाजपला सोडचिठ्ठी देत गोंदियाचे माजी आमदार रमेश कुथे यांनी

आज मुंबईत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करुन घरवापसी केली आहे.

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत

‘मातोश्री’वर त्यांचा पक्षप्रवेश झाला. त्यानंतर त्यांच्या गोंदिया विधानसभा मतदारसंघात

कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.

Read also: https://ajinkyabharat.com/kamala-harris-could-be-americas-best-president/

Related News