आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. याच
पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागले
आहेत. राज्यातील सर्वच पक्ष सध्या जोमाने मोर्चेबांधणी करताना दिसत
Related News
आहेत. अनेक ठिकाणी पक्ष नेतृत्वांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र दौरे
पार पडताना दिसत आहेत. तर दुसरीकडे पक्षांतर्गत बैठकींचे सत्रही
सुरु आहेत. त्यातच आता महायुतीच्या घटक पक्षांमध्ये जास्त जागा
पदरात पाडण्यासाठी चढाओढ पाहायला मिळत आहे. मात्र यामुळे
महायुतीत वादाची ठिणगी पडल्याचे पाहायला मिळत आहे. आता यावरुन
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे. भाजपामध्ये
किरीट सोमय्या नाराज असल्याची चर्चा आहे. किरीट सोमय्या यांची
निवडणूक आयोग संपर्कप्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
मात्र मला न विचारताच माझी नियुक्ती कशी केली? अशी विचारणा किरीट
सोमय्या यांनी पक्षाकडे केली. “मला अनेक कामं दिलेली आहेत. मोठं मोठी
काम करत आहे. म्हणूनच मी सुचवलं सगळीच काम मी करतोय, मला
कमिटी नको. पक्षाला जे पटलं त्यांनी सुधार केला. गेली साडेपाच वर्ष कोणतंही
पद माझ्याकडे नाही. भारतीय जनता पक्षातील सामान्य कार्यकर्ता म्हणून
मी काम करत आहे” असं किरीट सोमय्या म्हणाले. तर दुसरीकडे अजित पवार
यांनी अमित शाहांकडे मुख्यमंत्रिपदाची मागणी केली आहे. “महायुतीने
विधानसभा निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून माझे नाव घोषित करावे.
राज्यात बिहार पॅटर्न राबवावा”, असा प्रस्ताव अजित पवारांनी अमित शाह
यांच्यापुढे ठेवला. त्यामुळे महायुतीत यावरुन वाद होण्याची चिन्ह पाहायला
मिळत आहे. तसेच दुसरीकडे महायुतीतील घटक पक्षांकडून जागावाटपात
जास्तीत जास्त जागा द्या, अशी मागणी होत आहे. यामुळे यंदा विधानसभा
निवडणुकीत महायुतीत शिवसेना शिंदे गट, भाजप, राष्ट्रवादी अजित पवार
गट यांच्यात वाद होण्याची शक्यता पाहायला मिळत आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/gagawat-swachhta-hi-seva-campaign-between-27th-september-to-2nd-october/