हमखास यशाची खात्री असलेला पॅटर्न वापरणार
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून लवकरच
पहिली उमेदवारी यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
Related News
सानंदांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी ( अजित पवार ) मध्ये प्रवेश
आसाममध्ये उंदरांचा कहर :
इतिहासात १६ एप्रिल : भारतीय रेल्वेचा पहिला प्रवास,
तेल्हाऱ्यात शिवसेनेची आढावा बैठक संपन्न –
अलीगडमध्ये देवी-देवतांच्या चित्र असलेल्या नैपकिनवरून वाद; हॉटेल मालक अटकेत
निसर्गाचा अद्भुत चमत्कार
दिल्ली मेट्रोमध्ये महिलांचे भजन कीर्तन; CISF जवानांकडून फटकार,
गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात वेंटिलेटरवर असलेल्या एअर होस्टेसवर बलात्कार; पोलीस तपास सुरु
“उर्दू कोणत्याही धर्माची भाषा नाही”; पातूर पालिकेवरील उर्दू फलकाला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता
चालत्या ट्रेनमध्ये एटीएमची सुविधा! ‘फास्ट कॅश एक्सप्रेस’द्वारे प्रवाशांना नवे बँकिंग स्वातंत्र्य
मुंबई-अमरावती विमानसेवा सुरू; विदर्भवासीयांसाठी वेगवान प्रवासाचा नवा पर्याय
अकोला शहरात आता ५ दिवसाआड पाणीपुरवठा
या पहिल्या उमेदवारी यादीत 30 ते 40 उमेदवारांचा समावेश असण्याची शक्यता आहे.
येत्या काही दिवसांमध्ये निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषद घेऊन
विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल.
त्यानंतर लगेचच राज्यात निवडणुकीसाठीची आदर्श आचारसंहिता लागू होईल.
साधारण 20 सप्टेंबरच्या आसपास विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता
लागू होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यापूर्वीच भाजपकडून आपली पहिली उमेदवारी यादी
जाहीर केली जाऊ शकते, असा अंदाज आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीचे जागावाटप बराच काळ रखडले होते.
त्यामुळे अनेक महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघात शेवटच्या क्षणापर्यंत
महायुतीचे उमेदवार ठरले नव्हते. त्यामुळे या उमेदवारांना प्रचार करण्यासाठी
फारसा अवधी मिळाला नव्हता. याचा फटका महायुतीला बसला होता.
हाच अनुभव लक्षात घेता आता भाजपकडून विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम
जाहीर होण्यापूर्वीच 30 ते 40 उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली जाऊ शकते.
सूत्रांच्या माहितीनुसार, महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड विधानसभा निवडणुका
जाहीर होण्याआधीच भाजप आपल्या उमेदवारांची घोषणा करु शकते.
त्यामुळे भाजपच्या या पहिल्या उमेदवारी यादीत कोणाचा समावेश लागणार,
याविषयी आतापासून तर्कवितर्क लढवण्यास सुरुवात झाली आहे.
विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधीच भाजपची पहिली यादी
जाहीर होण्याची शक्यता आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/naga-chaitanya-shobhita-dhulipalashi-banana-sakharpuda/