भाजपने महाराष्ट्रासह चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले !

विधानसभेची

सुरू केली विधानसभेची तयारी.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर

आता भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

Related News

या वर्षी चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे.

यात महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मू-काश्मीरचा समावेश आहे.

दरम्यान, भाजप हायकमांडने या चार राज्यांसाठी

नवीन निवडणूक प्रभारी आणि सह-प्रभारी नियुक्त केले आहेत.

भूपेंद्र यादव यांना महाराष्ट्राचे प्रभारी बनवले आहे,

तर अश्विनी वैष्णव सहप्रभारी म्हणून काम पाहतील.

दुसरीकडे, हरियाणामध्ये धर्मेंद्र प्रधान यांना प्रभारी बनवण्यात आले आहे,

तर विपलव कुमार देव सहप्रभारी असतील.

तसेच शिवराज सिंह चौहान झारखंडचे प्रभारी असतील.

त्यांच्या मदतीला आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा सहप्रभारी म्हणून काम पाहतील.

यासोबतच जी किशन रेड्डी यांना जम्मू-काश्मीरचे प्रभारी बनवण्यात आले आहे.

ही नियुक्ती तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे.

Read also: कानशिवनी येथे गुणवंतांचा गौरव सोहळा संपन्न! (ajinkyabharat.com)

Related News