मुंबई – भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे
यांना मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर उद्या तातडीने शस्त्रक्रिया होणार
असल्याची माहिती समोर आली आहे.
मात्र, नेमकी कोणती शस्त्रक्रिया होणार आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
नारायण राणे हे महाराष्ट्रातील प्रखर नेते म्हणून ओळखले जातात.
ते शिवसेनेतून राजकारणात आले आणि काही काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनही कार्यरत होते.
त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले आणि नंतर भाजपमध्ये प्रवेश केला. ते केंद्र सरकारमध्ये मंत्रीपदावरही कार्यरत होते.
त्यांचे दोन्ही पुत्र – नितेश राणे आणि निलेश राणे हे राजकारणात सक्रीय आहेत.
नितेश राणे हे राज्य सरकारमध्ये मंत्री आहेत.
नारायण राणे हे नेहमीच उद्धव ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांचे तीव्र विरोधक राहिले आहेत.
त्यांच्या फटकळ भाषेमुळे ते कायम चर्चेत असतात.
सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने रुग्णालयात दाखल करून तातडीची शस्त्रक्रिया होणार आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/you-spend-your-spending/