भाजपाच्या जिल्हा कार्यकारिणीतून लोणार तालुका बाद

भाजपाच्या जिल्हा कार्यकारिणीतून लोणार तालुका बाद

भाजपने दोन दिवसा आधी आपली 29 सदस्यीय जिल्हा कार्यकारणी जम्बो यादी जाहीर केली.

मात्र यात लोणार तालुक्याला भाजपा च्या जिल्हा कार्यकारणीत स्थान मिळू शकले नाही.

स्थान न मिळणे म्हणजे पश संघटनेशी नाळ तुटल्याचा हा पुरावा असल्याचे मानले जात आ.हे

एकही सदस्ययाचे नाव नसल्याने सगळ्यांच्याचं भुवया उंचावल्या. अशावेळी यामागची नक्की कारणं काय असतील?

असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे

मागील वेळी लोणार तालुक्यातील तीन ते चार सदस्यांना जिल्हा कार्यकारणी मध्ये स्थान मिळाले होते .

परंतु यावेळी एकही सदस्य नियुक्त न होणे ही बाब लोणार भाजपा कार्यकर्त्यांना

आत्मचिंतन करणारी आहे.

भारतीय जनता पार्टी चे जिल्हाध्यक्ष म्हणून नुकतीच माजी आमदार विजयराज शिंदे यांची निवड झाली आहे ,

आधीपासूनच युवक दशेतूनच शिंदे यांना लोणार तालुक्याची संपूर्ण माहिती आहे,

कदाचित त्यांना लोणार तालुक्यात आगामी निवडणुकीत कमळं फुलण्याचे चिन्ह कमी वाटत असल्याने त्यांनी लोणार

तालुक्यातील कार्यकर्तापैकी एकही कार्यकर्ते ला आपल्या टीम मध्ये सहभागी केले नसावे अशी दबक्या आवाजात चर्चा आहे.

लोणार तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यां मध्ये आधीच तालुका अध्यक्ष निवडीमुळे दोन गट पडल्याचे बोलले जात आहे,

तालुका अध्यक्ष निवडीसाठी मतदान प्रकिया घेऊन ही त्याउलट निवड झाल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/an-khaki-aali-dhawun/